IPL 2021: Bapu returned! कोरोनावर मात करून स्टार गोलंदाज पुन्हा मैदानात

दिल्ली कॅपिट्ल्स संघातील स्टार गोलंदाज आणि सर्वांचा लाडका बापू पुन्हा टीमसोबत जोडला गेला आहे. 

Updated: Apr 23, 2021, 10:45 AM IST
IPL 2021: Bapu returned! कोरोनावर मात करून स्टार गोलंदाज पुन्हा मैदानात title=

मुंबई: हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. स्टार गोलंदाज कोरोनावर मात करून पुन्हा टीममध्ये परतला आहे. चार सामने सर्वजण या स्टार गोलंदाजाला मिस करत होते. आता 25 एप्रिल रोजी तो मैदानात उतरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स संघातील स्टार गोलंदाज आणि सर्वांचा लाडका बापू पुन्हा टीमसोबत जोडला गेला आहे. कोरोनावर यशस्वीपणे मात करून मैदानात उतरण्यासाठी तो तयार झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याचा व्हिडीओ ट्वीट करत बापू रिटर्न्स असं कॅप्शन दिलं आहे. 

अक्षर पटेलला नाडियाडचा 'जयसूर्या' असंही म्हटलं जातं. तर संघात त्याला प्रेमाने बापू म्हणतात. IPL सामना सुरू होण्याच्या एक दोन दिवस आधीच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पहिले काही सामने त्याला खेळता आलं नाही. मात्र कोरोनावर यशस्वीपणे मात करून तो पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 

हैरदाबाद विरुद्ध दिल्ली सामना 25 एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का हे पाहाणं सर्वांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.

 पंतचा संघ एकूण चार सामने खेळला आहे. त्यापैकी पहिला सामना चेन्नई विरुद्ध 7 विकेट्सने जिंकला. दुसरा सामना राजस्थान विरुद्ध 3 विकेट्सने गमावला. तिसरा सामना 6 तर चौथा सामना देखील 6 विकेट्सनं दिल्ली संघ जिंकला आहे. आता हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्यात जिंकण्यात यश मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.