मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अखेर ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती तो क्षण आला. कोरोनाचं सावट असलं तरी यंदा IPL 2022 चा 15 वा हंगाम भारतात होणार आहे. याचे सामने केव्हापासून सुरू होणार याची माहिती BCCI चे सचिव जय शहा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
BCCI चे सचिव जय शहा यांच्या म्हणण्यानुसार आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सामने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे सामने खेळवण्यात येतील. यंदा 10 टीम आणि 72 सामने असणार आहेत. 27 मार्चपासून सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय वाढत्या कोरोनामुळे भारतात IPL होऊ शकलं नाही तर दक्षिण आफ्रिका हा बॅक अप प्लॅन तयार असल्याची माहिती दिली आहे.
यंदाच्या आयपीएलसाठी विवो नाही तर टायटल स्पॉन्सर टाटा असणार आहे. त्यामुळे ती देखील सर्वात मोठी गोष्ट असणार आहे. विवोसोबतचा करार संपल्यानंतर आता टाटाने टायटल स्पॉन्सरशिप घेतल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील 4 स्टेडियममध्ये आयोजन
यंदाचे सामने भारतात होणार असल्याची माहिती देखील जय शहा यांनी दिली आहे. हे सामने महाराष्ट्रात खेळवले जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 4 स्टेडियममध्ये 15 व्या मोसमातील सामने पार पडतील.
राज्यात मुंबईत 2, नवी मुंबईत 1 आणि पुण्यात 1 असे एकूण 4 स्टेडियम आहेत. हे सर्व सामने मुंबईतील वानखेडे, बेब्रोन स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवले जातील. तसेच जर गरज पडली तर पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
यावेळेसही 15 व्या मोसमातील सर्व सामने हे क्रिकेट चाहत्यांशिवायच म्हणजेच बंद दाराआड खेळवण्यात येणार असल्याचंही म्हंटलं आहे. कोरोनाचा संसर्ग आणि धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
I am delighted to confirm that the 15th season of the IPL will start in the last week of March and will run until May end. A majority of the team owners expressed their wish that the tournament be held in India: BCCI Secretary Jay Shah#IPL2022
(File photo) pic.twitter.com/dUabG1p14h
— ANI (@ANI) January 22, 2022