IPL 2022 | ...म्हणून सुरेश रैना अनसोल्ड राहिला, कुमार संगकाराने अखेर कारण सांगितलंच

सुरेश रैना (Suresh Raina) अनसोल्ड का राहिला, त्याला खरेदी करण्यासाठी फ्रँचायजींनी का खरेदी केलं नाही, याबाबतचा खुलासा श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक असलेला कुमार संगकाराने (Kumar Sangakara) केला आहे.   

Updated: Mar 18, 2022, 07:46 PM IST
IPL 2022 | ...म्हणून सुरेश रैना अनसोल्ड राहिला, कुमार संगकाराने अखेर कारण सांगितलंच  title=

मुंबई : आयपीएलची (IPL 2022)  क्रिकेट चाहते (Cricket Fans) आवर्जून वाट पाहतात. यंदाच्या मोसमापासून पुन्हा 10 टीम आमनेसामने भिडणार आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी थरार आणि थरार अनुभवायला मिळणार आहे. या 15 व्या मोसमासाठी नुकताच मेगा ऑक्शन पार पडला. या मेगा ऑक्शनमध्ये युवा खेळाडूंची चांदी झाली. मात्र अनेक दिग्गज खेळाडू हे अनसोल्ड राहिले. त्यापैकी एक म्हणजेच 'मिस्टर आयपीएल' (Mister IPL) अशी ओळख असलेला (Suresh Raina) सुरेश रैना. (ipl 2022 rajasthan royals director of cricket kumar sangkara revels reason of  suresh raina is why unslod)

आयपीएलमध्ये धमाका करणारा रैना अनसोल्ड राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र रैना अनसोल्ड का राहिला, त्याला खरेदी करण्यासाठी फ्रँचायजींनी का खरेदी केलं नाही, याबाबतचा खुलासा श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक असलेला कुमार संगकाराने केला आहे. 

संगकारा काय म्हणाला?

रैना अनसोल्ड राहण्यामागे अनेक कारणं आहेत. जसं जसं वेळ निघून जातो, तसं तसं खेळाडू बदलत जातात. तसेच युवा खेळाडू हे आपली छाप सोडत असतात", असं संगकारा म्हणाला. 

"रैनाची आयपीएलमध्ये फार प्रतिष्ठा आहे. रैना शानदार खेळाडू आहे. रैनाची कामगिरी प्रत्येक मोसमानंतर आणखी बहरत जाते. रैना शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधील आघाडीचा क्रिकेटर आहे. जेव्हा बारीकसारीक गोष्टी पाहिल्या जातात, तेव्हा रैना आगामी मोसमासाठी उपयुक्त नसल्याचं लक्षात येतं. या सर्व बारीकसारीक गोष्टीचं निरीक्षण सर्व क्रिकेट विश्लेषक, कोच फ्रँचायजीचे मालक करत असतात", असं  संगकारा म्हणाला.