IPL 2023: CSK चाहत्यांसाठी मोठी बातमी! फायनल सामन्यापूर्वीच 'त्याने' केली निवृत्ती जाहीर, म्हणाला "आता अजिबात..."

Ambati Rayudu IPL Retirement: आज आयपीएलच्या 16 (IPL 16) व्या हंगामातील अंतिम सामना होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात हा सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधीच चेन्नईचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने (Ambati Raydu) मोठी घोषणा केली आहे. अंबाती रायडूने आयपीएलमधून निवत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. हा त्याचा शेवटचा अंतिम सामना असणार आहे.   

शिवराज यादव | Updated: May 28, 2023, 06:59 PM IST
IPL 2023: CSK चाहत्यांसाठी मोठी बातमी! फायनल सामन्यापूर्वीच 'त्याने' केली निवृत्ती जाहीर, म्हणाला "आता अजिबात..." title=

Ambati Rayudu IPL Retirement: आज आयपीएलच्या 16 (IPL 16) व्या हंगामातील अंतिम सामना आज होणार आहे. मात्र त्याआधीच चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. कारण चेन्नईचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने (Ambati Raydu) मोठी घोषणा केली आहे. अंबाती रायडूने आयपीएलमधून निवत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. अंबाती रायडूने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

आज चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधीच अंबाती रायडूने (Ambati Raydu) निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. हा अंतिम सामना असेल अशी माहिती अंबाती रायडूने दिली आहे. 

ट्वीटमध्ये रायडूने लिहिलं आहे की "दोन महान संघ मुंबई आणि सीएसकेसाठी खेळलो. 204 सामने, 14 सीझन, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आज रात्री सहावी जिंकेन अशी आशा आहे".

'निर्णयावरुन यु-टर्न घेणार नाही'

अंबाती रायडूने पुढे लिहिलं आहे की "हा खूप मोठा प्रवास होता. आज होणारा आयपीएलचा अंतिम सामना हा माझा शेवटचा सामना असेल असा निर्णय मी घेतला आहे. मला या स्पर्धेत खेळताना खूप मजा आली. तुम्हा सर्वांचे आभार. आता कोणताही यु-टर्न नाही". 

अंबाती रायडू आज होणारा आयपीएल अंतिम सामना वगळता आतापर्यंत 203 आयपीएल सामन्यात खेळला आहे. यादरम्यान रायडूने 28.29 च्या सरासरीने 4320 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 22 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं. 

पण 2023 चा आयपीएल हंगाम अंबाती रायडूसाठी काही खास राहिला नाही. त्याने 15 सामन्यात 15.44 च्या सरासरीने फक्त 139 धावा केल्या. आयपीएल 2023 मध्ये अंबाती रायडूला खासकरुन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरण्यात आलं. 

अंबाती रायडू 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिला आहे. त्याने 2013, 2015 आणि 2017 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खिताब जिंकला आहे. तर 2018 आणि 2021 मध्ये तो चेन्नई संघात असताना ट्रॉफी जिंकली होती. 

गतवर्षी मागे घेतला होता निवृत्तीचा निर्णय

अंबाती रायडूने गतवर्षीही अचानक ट्वीट करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर त्याने आपलं हे ट्वीट डिलीट केलं होतं. तेव्हा रायडूने 2022 चा हंगाम अखेरचा असेल असं जाहीर केलं होतं. पण चेन्नई संघाचे CEO काशी विश्वनाथ यांनी हे चुकीचं वृत्त असून अंबाती रायडू संन्यास घेत नसल्याचं सांगितलं होतं. 

मात्र यावेळी अंबाती रायडूने ट्वीट करताना आता यु-टर्न घेणार नाही असं सांगत आपण आता निवृत्तीच्या निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यावेळी तो निर्णय मागे घेणार नाही हे नक्की आहे. 

2019 मध्येही निवृत्ती घेतली होती मागे

याआधी अंबाती रायडूने 2019 मध्ये वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र यानंतर दोन महिन्याने त्याने निर्णय मागे घेतला होता. त्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पाठवलेल्या मेलमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. याआधी 2018 मध्ये त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला होता. 

रायडूने भारताकडून 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47.05 च्या सरासरीने 1,694 धावा केल्या आहेत. 124 वर नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतकेही झळकावली आहेत. रायडूने 6 टी-20 सामने खेळले असून 10.50 च्या सरासरीने केवळ 42 धावा केल्या. याशिवाय रायुडूच्या नावावर 97 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6,151 धावा आहेत.