IPL 2023 Eliminator: मुंबईच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! जेव्हा जेव्हा MI vs LSG सामना झाला तेव्हा...

IPL 2023 Eliminator MI vs LSG Records: आज इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या पर्वातील एलमिनेटर सामना मुंबई आणि लखनऊच्या संघादरम्यान खेळवला जाणार असून चौथ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत.

IPL 2023 Eliminator: मुंबईच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! जेव्हा जेव्हा MI vs LSG सामना झाला तेव्हा...
IPL 2023 Eliminator

Eliminator IPL 2023 MI vs LSG Head to Head Records: इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या पर्वाचा (IPL 2023) अंतिम सामना खेळणारा संघ 23 मे रोजी चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात निश्चित झाला. चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा (CSK Beat GT) 15 धावांनी पराभव करत 10 व्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली. आज आयपीएलमधील एलिमिनेटर (Eliminator IPL 2023) सामना पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान (MI vs LSG) आज एलिमिनेटरचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात पराभूत होणार संघ थेट स्पर्धेबाहेर पडणार आहे. तर विजयी संघ क्वालिफायर-2 (Qualifer-2) मध्ये गुजरातच्या संघाविरुद्ध मैदानात उतरेल. आज होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि लखनऊचे यापूर्वीच रेकॉर्ड पाहिल्यास मुंबईच्या चाहत्यांचं टेन्शन नक्कीच वाढेल.

मुंबईची वाटचाल कशी?

मुंबई आणि लखनऊचा संघ चेन्नईच्या स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ साखळी फेरीमध्ये चौथ्या स्थानी राहून प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केल्याने मुंबईचं प्लेऑफ्सचं तिकीट निश्चित झालं. मुंबईच्या संघाने 8 सामने जिंकले तर 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. 16 गुणांसहीत नेट रन रेटच्या जोरावर मुंबईचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला.

लखनऊची दमदार कामगिरी

दुसरीकडे के. एल. राहुल दुखापतग्रस्त झाल्याने लखनऊचं नेतृत्व क्रृणाल पंड्या करत आहे. साखळी फेरीमध्ये लखनऊच्या संघाने तिसरं स्थान पटकावलं. 14 पैकी 8 सामने लखनऊच्या संघाने जिंकले. तर 5 सामन्यांमध्ये लखनऊच्या संघाचा पराभव झाला. चेन्नई आणि लखनऊच्या एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे लखनऊचा संघ 17 गुणांसहीत पात्र ठरला. 

मुंबईच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी

मुंबई आणि लखनऊचा संघ आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा आमने-सामने आला आहे. यापैकी 2 सामने मागील पर्वात खेळवण्यात आलेले आहेत. यंदाच्या पर्वात मुंबई आणि लखनऊ एकदाच आमने-सामने आले असून या सामन्यात लखनऊने विजय मिळवला. मागील पर्वातील दोन्ही सामन्यांमध्येही लखनऊने मुंबईला धूळ चारली होती. यंदाच्या पर्वात लखनऊने मुंबईचा 5 धावांनी पराभव केला होता. अवघ्या 117 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 112 धावांपर्यंतच मजल मारु शकला होता. पहिल्यांदाच हे दोन्ही संघ चेन्नईच्या मैदानावर आमने सामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये मुंबई बाजी मारणार की लखनऊ विजयी चौकार लगावणार हे आज सायंकाळीच स्पष्ट होईल. मात्र आतापर्यंतची आकडेवारी ही मुंबईच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारीच आहे.

चेन्नईने केलं तेच मुंबईला करावं लागणार

मुंबईला चेन्नईने जे केलं तेच करावं लागणार आहे. कालच्या सामन्यापूर्वी चेन्नई आणि गुजरातदरम्यान 3 सामने झाले होते. हे तिन्ही सामने गुजरातनेच जिंकले होते. चेन्नईने काल पहिल्यांदाच गुजरातविरुद्धचा सामना जिंकला आणि थेट अंतिम सामन्याचं तिकीट निश्चित केलं. आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाला चेन्नईसारखा चमत्कार करता येतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज़

Odhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी 'त्या' बापाची कहाणी

Odhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी 'त्या' बापाची कहाणी

Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!

Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!

Odisha Train Accident: "अपघाताचे कारण सापडले, लवकरच..."; घटनास्थळी ठाण मांडून बसलेल्या रेल्वेमंत्र्यांची माहिती

Odisha Train Accident: "अपघाताचे कारण सापडले, लवकरच..."; घटनास्थळी ठाण मांडून बसलेल्या रेल्वेमंत्र्यांची माहिती

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...

दारू तस्करांना सोडवण्यासाठी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

दारू तस्करांना सोडवण्यासाठी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

'दोषींना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा होईल', दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

'दोषींना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा होईल', दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग 'या' टिप्स नक्कीच करा फॉलो

कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग 'या' टिप्स नक्कीच करा फॉलो

'भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार', झी 24 तासच्या सहकार परिषदेत प्रवीण दरेकरांचे संकेत

'भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार', झी 24 तासच्या सहकार परिषदेत प्रवीण दरेकरांचे संकेत

रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत

रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत

इतर बातम्या

जळगाव स्टेट बँक दरोड्याची २४ तासांत उकल, पीएसआयनेच वडिलांसो...

महाराष्ट्र