महेंद्रसिंग धोनी 'त्या' रात्री ढसाढसा रडला; हरभजन सिंहने केला धक्कादायक खुलासा..

Harbhajan Singh Shocking Statement on Dhoni: चेन्नईचा नियमित कॅप्टन धोनीसाठी (Mahendra Singh) देखील भावनिक क्षण होता. त्यावर आता चेन्नईच्या संघाचा माजी फिरकीपटू आणि समालोचक हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated: May 24, 2023, 10:29 AM IST
महेंद्रसिंग धोनी 'त्या' रात्री ढसाढसा रडला; हरभजन सिंहने केला धक्कादायक खुलासा.. title=
Harbhajan Singh On MS Dhoni

Harbhajan Singh On MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी कदाचित सर्वात निराशाजनक क्षण होता जेव्हा सीएसकेला दोन वर्षांसाठी आयपीएलमधून बंदी (CSK Ban In IPL) घालण्यात आली होती. न्यायमूर्ती लोढा समितीने मॅच फिक्सिंग (Match Fixing) आणि बेटिंग अॅक्टिविटीमुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर इंडियन प्रीमियर लीगमधून 2 वर्षांसाठी म्हणजेच 2016 आणि 2017 साठी बंदी घालण्यात आली होती. क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच होता.

चेन्नईच्या खेळाडूंसाठी ही शॉकिंग न्यूज होती. काही खेळाडूंनी यावर बोलणं मात्र टाळलं होतं. चेन्नईचा नियमित कॅप्टन धोनीसाठी देखील हा भावनिक क्षण होता. त्यावर आता चेन्नईच्या संघाचा माजी फिरकीपटू आणि समालोचक हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला Harbhajan Singh?

चेन्नईच्या संघावर बंदी घातल्यानंतर 2 वर्षांनी संघ पुन्हा आयपीएलमध्ये आला. त्यानंतर संघाच्या खेळाडूंनी एका डिनर पार्टीचे आयोजन केलं होतं. आपण म्हणतो की, पुरुष रडत नाही, आपण सर्वांनी नेहमी ऐकलं असेल. पण महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) त्या रात्री खूप रडला. धोनी खूप भावनिक झाला होता. मला वाटतं हे कुणालाच माहित नसेल, असं हरभजनने म्हटलं आहे.

आम्ही पुन्हा सीएसके (CSK) म्हणून मैदानात उतरणार होतो, धोनीसाठी तो क्षण खूप भावनिक होता. मी देखील त्यावेळी तिथं होतो. धोनी संघाला एक कुटुंब म्हणून पाहतो, हे आम्हाला त्यादिवशी कळालं. म्हाताऱ्यांचा संघ म्हणून आम्हाला हिणवलं जात होतं. मात्र, आम्ही दोन वर्षांनी मैदानात उतरलो आणि ट्रॉफी जिंकली, असं म्हणत इमरान ताहीरने देखील हरभजनच्या विधानाला दुजोरा दिला आहे.

पाहा Video 

दरम्यान, आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. सर्वात तगड्या बॅटिंग लाईनअपला ऑलआऊट करण्याचं काम धोनी अँड कंपनीने केलं आहे. त्यामुळे धोनीचं सध्या कौतूक होताना दिसतंय. चेपॉकच्या समारोपावेळी धोनीने चाहत्यांचे आभार मानले. त्यावेळी आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणार की नाही? यावर धोनीने आपलं मत मांडलं. आगामी हंगामात खेळण्याबाबत आगामी ऑक्शनच्या आधी निर्णय घेईल, असं धोनीने म्हटलं आहे. त्यासाठी अजून 8 ते 10 महिन्याचा अवधी असल्याचं देखील धोनीने म्हटलं आहे.