IPL 2023: सचिन, विराटशी होणाऱ्या तुलनेवर शुभमन गिल स्पष्टच बोलला, म्हणाला "खरं तर..."

IPL 2023: आयपीएलमध्ये (IPL) तीन शतकं ठोकल्याने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टाऱ खेळाडू शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. शुभमन (Shubhan Gill) प्रचंड फॉर्ममध्ये असून भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याची तुलना आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गजांशी केली जात आहे. त्यावर आता शुभमनने भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 29, 2023, 04:05 PM IST
IPL 2023: सचिन, विराटशी होणाऱ्या तुलनेवर शुभमन गिल स्पष्टच बोलला, म्हणाला "खरं तर..." title=

Shubhman Gill on Sachin, Virat: आयपीएलमध्ये (IPL) तीन शतकं ठोकल्याने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टाऱ खेळाडू शुभमन गिल सध्या चांगलाच चर्चेत आहे. शुभमनने फक्त आयपीएलच नाही तर सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं आहे. यामध्ये त्याने न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय सामन्यात झळकावलेल्या दुहेरी शतकाचाही समावेश आहे. सध्या शुभमन (Shubhan Gill) प्रचंड फॉर्ममध्ये असून भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याची तुलना आता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गजांशी केली जात आहे. त्यावर आता शुभमनने भाष्य केलं आहे. 

23 वर्षीय शुभमन गिलने केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघ सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. शुभमनने 16 सामन्यात 60.79 च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने तीन शतकं झळकावली असून, ही तिन्ही शतकं शेवटच्या चार सामन्यातील आहेत. शुभमन गिलची जबरदस्त खेळी पाहता त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा स्टार विराट कोहलीशी केली जात आहे. यांच्यानंतर शुभमन गिल भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाईल असं क्रिकेट चाहते म्हणत आहेत. 

दरम्यान, शुभमन गिलने ANI शी बोलताना सचिन आणि विराटशी होणाऱ्या तुलनेवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अनेकांना प्रेरणा दिली असून, त्यांचा वारसा अजरामर आहे अशी भावना शुभमनने व्यक्त केली आहे. हे खेळाडू किती मोठे आहेत ते शब्दांत सांगितलं जाऊ शकत नाही असंही त्याने म्हटलं आहे. 

"लोक अशा नजरेने पाहतात हे नक्कीच माझ्यासाठी कौतुकास्पद आहे. पण मी त्याकडे अशा नजरेने पाहत नाही. कारण सचिन सर, विराट भाई आणि रोहित शर्मा यांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं असून ते सगळ्या पलीकडचं आहे. जर आपण 1983 चा विश्वचषक जिंकला नसता तर सचिन तेंडुलकर नसता. जर आपण 2011 चा विश्वचषक जिंकलो नसतो तर इतकी प्रेरणा मिळाली असती का..कदाचित नाही. त्यामुळे अशा प्रकारचा वारसा अजरामर असतो. तुम्ही ते शब्दांत मांडू शकत नाही," असं शुभमनने सांगितलं आहे.

दरम्यान आज आयपीएलचा अंतिम सामना होणार असून गुजरात टायटन्स आणि चेन्नई संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी सचिन तेंडुलकरने शुभमन गिलचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्याची शांतता, थंड डोक्याने खेळी, धावांची भूक आणि विकेट्सच्या दरम्यान चपळ धावणं मला जास्त प्रभावित केलं असल्याचं सचिनने म्हटलं आहे. 

सचिनने शुभमनचा बॅट उचावतानाचा फोटो आणि आयपीएलच्या चषकाबरोबरचा गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या तसेच चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा फोटो पोस्ट केला आहे. "शुभमन गिलची यंदाच्या पर्वातील कामगिरी ही अविस्मरणीय आहे. 2 शतकांचा समावेश असलेला सामना फारच प्रभावी ठरला. एका शतकाने मुंबई इंडियन्सच्या अपेक्षा वाढवल्या. तर दुसऱ्याने ते अपेक्षा चिरडून टाकल्या. क्रिकेट हा खेळच असा अंदाज न व्यक्त करता येण्याजोगा आहे," असं सचिनने शुभमनाला टॅग करत म्हटलं आहे.