LSG Owner Vs Gambhir: मुंबईविरुद्धच्या लाजिरवाण्या परभावानंतर गंभीर थेट संघमालकांशीच भिडला? लवकरच गंभीरला मिळणार डच्चू?

Argument between LSG Owner And Gambhir: आयपीएलमधील 'करो या मरो'च्या सामन्यामध्ये लखनऊच्या संघाचा मुंबई इंडियन्सने तब्बल 81 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.

LSG Owner Vs Gambhir: मुंबईविरुद्धच्या लाजिरवाण्या परभावानंतर गंभीर थेट संघमालकांशीच भिडला? लवकरच गंभीरला मिळणार डच्चू?
LSG Owner Vs Gambhir

Argument between LSG Owner And Gambhir: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) एलिमिनेटर (IPL Eliminator) सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) संघाचा बुधवारी दारुण पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि श्रेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये लखनऊला धोबीपछाड देताना तब्बल 81 धावांनी विजय मिळवला. या विजयासहीत आता मुंबईचा संघ गुजरातविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळण्यासाठी अहमदाबादला रवाना झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील एलिमिनेटरचा सामना फारसा चुरशीचा झाला नाही. या सामन्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच लखनऊचा मेन्टॉर गौतम गंभीरलाही (Gautam Gambhir) चांगलेच ट्रोल केले जात आहे. या स्पर्धेमध्ये अनेकदा गंभीर आक्रमक अवतारात दिसला. मात्र कालच्या सामन्यात गंभीरचा चेहरा पडलेला दिसून आला. सामन्यानंतरचा गंभीरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून त्यावरुन तर्क वितर्क काढले जात आहेत. 

सामन्यानंतरचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेत

हा सामना एकतर्फी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. मुंबईने तसं माफक म्हणजेच 183 धावांचं आव्हान दिलेलं असताना लखनऊचा संघ केवळ 101 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे 3.3 ओव्हर शिल्लक असतानाच लखनऊचा संघ तंबूत परतला. लखनऊच्या संघाला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आल्या नाहीत. मुंबईच्या आकाश मधवालने 5 धावा देत लखनऊचे 5 गडी तंबूत धाडले. या पराभवानंतर मैदानावरच गौतम गंभीर आणि लखनऊच्या संघाचे मालक संजीव गोयंका (LSG Owner Sanjiv Goenka) यांच्यात चर्चा झाल्याचं दिसून आलं. मात्र या दोघांच्या हावभावावरुन त्या दोघांमध्ये काही कारणाने विरोधी मत मांडत होते की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हायरल फोटोमध्ये संजीव गोयंका थोड्या चिडक्या हावभावासहीत गंभीरला काहीतरी समाजावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. 

गंभीरला डच्चू

सोशल मीडियावर गंभीर आणि संजीव गोयंकांमधील संवाद हा वादच होता असे दावे करणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मुळात गंभीरला त्याच्या अती आक्रमक शैलीमुळे ट्रोल करण्यात येत असतानाच हा व्हिडीओ समोर आल्याने टीकाकारांना आयतं कोलित हाती मिळालं आहे. गंभीर पुढील पर्वामध्ये लखनऊच्या संघासोबत नसेल अशी शक्यता व्यक्त करतानाच त्याला मेन्टॉरशीप पदावरुन डच्चू दिला जाईल असाही एक अंदाज आहे.

वादामुळे संघ चर्चेत

मुंबईविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघाला गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नाही. अनेक खेळाडू धावबाद झाल्याचं पहायला मिळालं. मैदानातील खेळाबरोबरच वादांमुळेही यंदा लखनऊ चांगलीच चर्चेत राहिली. तर लखनऊच्या खेळाडूंबरोबर मेन्टॉर गंभीरने अनेक सामन्यांमध्ये दर्शकांकडे पाहून केलेले हावभाव, विराट कोहलीबरोबर घातलेला वाद हे सारे विषयही चांगलेच गाजले. 

ट्रेंडिंग न्यूज़

Odhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी 'त्या' बापाची कहाणी

Odhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी 'त्या' बापाची कहाणी

कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग 'या' टिप्स नक्कीच करा फॉलो

कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग 'या' टिप्स नक्कीच करा फॉलो

'भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार', झी 24 तासच्या सहकार परिषदेत प्रवीण दरेकरांचे संकेत

'भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार', झी 24 तासच्या सहकार परिषदेत प्रवीण दरेकरांचे संकेत

रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत

रेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत

कुणाचं डोकं, कुणाचे हात - पाय नव्हते, पण....; दु:ख विसरून प्रवाशाने वाचवला 2 वर्षाच्या मुलाचा जीव

कुणाचं डोकं, कुणाचे हात - पाय नव्हते, पण....; दु:ख विसरून प्रवाशाने वाचवला 2 वर्षाच्या मुलाचा जीव

घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा

घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा

Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!

Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!

Odisha Train Accident: "अपघाताचे कारण सापडले, लवकरच..."; घटनास्थळी ठाण मांडून बसलेल्या रेल्वेमंत्र्यांची माहिती

Odisha Train Accident: "अपघाताचे कारण सापडले, लवकरच..."; घटनास्थळी ठाण मांडून बसलेल्या रेल्वेमंत्र्यांची माहिती

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...

इतर बातम्या

घरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमं...

भविष्य