IPL 2024 CSK vs LSG : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आमने सामने होते. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात लखनऊने चेन्नईवर सहा विकेटने मात केली. पहिली फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने लखनऊसमोर विजयासाठी 211 धावांच आव्हान ठेवलं होतं. मार्कस स्टॉईनिसच्या (Marcus Stoinis) तुफान फटकेबाजीच्या जोरावर लखनऊने हे आव्हान 19.3 षटकात पूर्ण केलं. स्टॉयनिसने 124 धावांची मॅचविनिंग खेळी केली. या सामन्यादरम्यानचा एक क्षण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
लखनऊ सुपर जायंट्सचा ऑलराऊंडर खेळाडू मार्कस स्टॉयनिस मैदानावर पाय रोवून उभा होता. लखनऊचे सुरुवातचे फलंदाज झटपट बाद झाले आणि स्टेडिअमवर चेन्नईच्या पाठिराख्यांचा तुफान जल्लोष सुरु होता. संपूर्ण स्टेडिअम पिवळ्या रंगाने न्हाऊन गेलं होतं. लखनऊचा संघ बॅकफूटला गेला होता. पण त्याचवेळी लखनऊच्या मदतीला धावून आला तो ऑलराऊंडर खेळाडू मार्कस स्टॉयनिस. अशक्य आव्हान समोर असतानाही स्टॉयनिस कोणतंही दडपण न घेता मैदानावर पाय रोवून उभा राहिला.
स्टेडिअमचं वातावरण बदललं
यलो आर्मीच्या जल्लोषाने चेपॉकवरचं वातावरण भारावून गेलं होतं. पण जसजशी स्टॉयनिसने फटकेबाजी सुरु केली. तसतसं स्टेडिअमवरचं वातावरण बदलत गेलं. जल्लोषाची जागा शांततेने घेतली. लखनऊ विजयाच्या अगदी जवळ आल्यानंतर तर स्टेडिअममधली यल्लो आर्मी चिडीचूप झाली. पण यात एका चाहत्याने लक्ष वेधून घेतलं. यल्लो आर्मीमध्ये घेरला गेलेला लखनऊचा एक चाहता विजयाचा जल्लोष करताना दिसला. मैदानावर स्टॉयनिस तर स्टेडिअममध्ये हा चाहता चेन्नईला एकटे भिडत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांनी लखनऊच्या या चाहत्याचं कौतुक केलं आहे.
Satisfying pic.twitter.com/VOCbSoVEHZ
— Yash (@YashR066) April 23, 2024
CSK vs LSG सामना
आयपीएलच्या 39 व्या सामन्यात लखनऊने चेन्नईचा पराभव पॉईंटटेबलमध्ये थेट टॉप फोरमध्ये जागा पटकावली आहे. चेन्नई सुपर किंग्सने पहिली फलंदाजी करत निर्धारीत 20 षटकात 4 विकेट गमावत 210 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 60 धावात 108 धावांची खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर शिवम दुबेने 66 धावांची खेळी करत चेन्नईला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला.
विजयाचं हे आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या लखनऊची सुरुवात खराब झाली. क्विंटन दी कॉक, केएल राहुल, देवदत्त पड्डिकल झटपट बाद झाले. पण त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली. या दोघांनी तुफान फटकेबाजी करत अशक्य वाटणारा विजय सोपा केला. पूरन 34 धावांवर बाद झाला. तर स्टॉयनिसने नाबाद 124 धावांची खेळी केली. या विजयाबरोबरच लखनऊच्या खात्यात 8 पॉईंट जमा झाले असून आयपीएल पॉईंटटेबलमध्ये चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पराभवामुळे चेन्नई पाचव्या क्रमांकावर घसरली आहे.
IND
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
ENG
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
England beat India by 5 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
SAM-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
PNG-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.