IPL 2024 KKR vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान आज आयपीएल 2024 चा 10 वा सामना रंगणार आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ आतापर्यंत दोन सामने खेळला असून एकात विजय तर एकात पराभव पत्करावा लागला आहे. कोलकाताचा (KKR) आतापर्यंत एक सामना झाला असून त्यांनी विजयी सुरुवात केली आहे. बंगळुरु आणि कोलकातादरम्यान हा सामना होणार असला तरी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल ते विराट कोहली (Virat Kohli) आणि मिटेल स्टार्कवर. मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यंदाच्या आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू आहे.
विराट-स्टार्क आमने सामने
यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कवर तब्बल 24 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात विक्रमी बोली ठरली होती. पण हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मिचेल स्टार्कला एकही विकेट घेता आली नव्हती. चार षटकात स्टार्कने तब्बल 53 धावांची खैरात दिली होती. पण आयपीएलचा इतिहास पाहता विराट कोहलीला डावखुऱ्या गोलंदाजासमोर खेळताना अडचणीचा सामना करावा लागलाय. कोहलीने डावखुऱ्या गोलंदाजांसमोर 31 डावात 45.4 च्या अॅव्हरेटने धावा केल्यात. आयपीएलच्या 120 सामन्यात तो डावखुऱ्या गोलंदाजांसमोर तब्बल 47 वेळा बाद झाला आहे.
विराट कोहली फॉर्मात
पण विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म बघता मिचेल स्टार्कला अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे. पंजाब किंग्सविरुध्दच्या शेवटच्या सामन्यात विराटने अवघ्या 49 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली होती. यात त्याने 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधला रेकॉर्ड पाहिला तर विराट कोहलीची मिचेल स्टार्कविरुद्धची कामगिरी दमदार आहे. विराटने स्टार्कविरुद्ध 5 डावात 47 धावा केल्यात. विशेष म्हणजे कोहली स्टार्कसमोर अद्याप एकदाही बाद झालेला नाही.
मिचेल स्टार्क आयपीएलमधला महागडा खेळाडू
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू आहे कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी 24.75 लाख रुपये मोजले आहेत. म्हणजे आयपीएलमध्ये मिचेल स्टार्क ग्रुप स्टेमधले सर्व 14 सामने खेळल्यास प्रत्येक सामन्यात 4 षटकं याप्रमाणे 336 चेंडू टाकेल. प्रत्येक चेंडूचा हिशोब केला तर मिचेल स्टार्कने टाकलेला प्रत्येक चेंडू हा 7.40 लाखांचा असेल. पण कोलकाता नाईट रायडर्स अंतिम सामन्यात पोहोचल्यास मिचेल स्टार्क एकूण 17 सामने खेळेल. म्हणजे तो 408 चेंडू टाकेल. असं झाल्यासत मिचेल स्टार्कने टाकलेला प्रत्येक चेंडू 6.1 लाख रुपयांना असेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB)
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जैक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार वैशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कैमरन ग्रीन, अल्जारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरेन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान
कोलकाता नाइट राइडर्स (KKR)
श्रेयस अय्यर (कर्णधार), नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, फिल साल्ट, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसैन