कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली

IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

Pravin Dabholkar | Updated: Apr 7, 2024, 07:39 AM IST
कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली title=
IPL 2024 RCB

IPL 2024, RR vs RCB: आयपीएल 2024 मधील सामने रंगतदार वळणावर आहेत. नुकताच राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळाला. विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 6 धावांनी पराभव झाला.विराट कोहलीने या मॅचमध्ये 72 बॉल्समध्ये ११३ रन्सची नाबाद खएळी केली. यावेळी त्याने 12 फोर आणि 4 सिक्सर लगावले. 156.94 च्या स्ट्राइक रेटने बॅटींग करत कोहलीने फॅन्सना चांगलेच खूश केले. स्टेडियममध्ये कोहलीच्या नावाचा नारा घुमत होता. असे असले तरी टीम आरसीबीसाठी ही खेळी निष्फळ अशी ठरली. कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळूरने पहिल्या डावात बॅटींग करताना 3 विकेटच्या बदल्यात 183 रन्स केले. पण राजस्थान रॉयल्सनेदेखील याला तोडीस तोड उत्तर दिले. आरसीबीच्या आव्हानाला राजस्थान रॉयल्सच्या रॉस बटलरने नाबाद शतकी खेळी करुन जशास तसे उत्तर दिले. यामध्ये राजस्थानच्या टीमने 5 चेंडू राखून सामना खिशात टाकला. 

कॅप्टन डु प्लेसिसने सांगितलं हरण्यामागचं खरं कारण 

राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमधील मॅच 6 विकेटनी हरल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसने काय चुकलं? याबद्दल सांगितलं. विकेट खूप किचकट होती. 183 हा आमचा स्कोर चांगला झालाय, असं आम्हाला वाटतं होतं. विराट बॅटींग करत होता तेव्हा विकेट खूप क्लिष्ट होती. त्यामुळे 190 च्या पुढचा स्कोर चांगला ठरला असता. आम्हाला अजून 10 ते 15 रन्स आणखी बनवायला हवे होते, अशी कबुली आरसीबीच्या कॅप्टनने दिली.

दवामुळे बदलला खेळ 

विराट कोहली खूप चांगला खेळ करत होता. आम्ही आणखी चांगला खेळ करु शकलो असतो पण विकेट आणखी क्लिष्ट होत गेली. स्पिनर्सने टाकलेला बॉल बॅटच्या खाली राहत होता. त्यानंतर पिच चांगली होत गेली. दवाचा देखील परिणाम होतात. 

सिक्सर मारुन आपलं शतक पूर्ण करणाऱ्या रॉस बटलरने विराट कोहलीचं शतक निष्फळ ठरवलं.राजस्थान रॉयल्सने आरसीबीला 6 विकेटने हरववे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आणि चारही जिंकून टीम गुणतालिकेत टॉपवर आहे. तर आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव असून ते आठव्या स्थानी घसरले आहेत.

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय