भोपाळ : तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी आयपीएल खेळाडू गोत्यात आला आहे. क्रिकेटपटू मोहनीश मिश्रा आणि त्याच्या मित्रांवर एका तरुणीचं अपहरण केल्याचा गुन्हा भोपाळमध्ये दाखल करण्यात आलाय. मोहनीश आणि तिच्या मित्रांनी तरुणीचं अपहरण केलं आणि तिला रेल्वे ट्रॅकवर नेण्यात आलं. तिकडे तरुणीला हाणामारी करण्यात आली आणि तिचे कपडे फाडून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुळची केरळची असलेली २७ वर्षांची मुलगी भोपाळमध्ये कोचिंगमध्ये अकाऊंटंट आहे. शुक्रवारी कामावर असताना दुपारी १२ वाजता मित्र आशिष सिंग यानं आपल्याला बाहेर बोलावलं. यानंतर त्यांनी मला जबरदस्ती गाडीमध्ये बसवलं आणि रेल्वे ट्रॅकवर नेलं. या ठिकाणी आशिषबरोबरच रिंकू, गोलू, मोहनीश यांनी मला मारहाण केल्याचा आरोप तरुणीनं केला आहे.
तू विक्रम (कोचिंग संचलक)सोबत जास्तच फिरत आहेस. तुमच्या दोघांमध्ये काय चाललं आहे. असे प्रश्न मला आशिषनं विचारले आणि यानंतर त्या सगळ्यांनी मला मारहाण केली, असं तरुणीनं पोलिसांना सांगितलं आहे.
तरुणीला मारहाण केल्यानंतर आरोपी कोचिंगमध्ये पोहोचले आणि तिकडे जाऊन कोचिंगचे उपाध्यक्ष विक्रम सिंग यांनाही मारहाण केली आणि कार्यालयाचीही तोडफोड केली.
दरम्यान मोहनीश मिश्रानं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. आशिष माझा मित्र असल्यामुळे त्या तरुणीनं माझं नाव घेतल्याचं मोहनीशनं सांगितंल.
आयपीएलच्या चौथ्या मोसमामध्ये मोहनीश पुणे वॉरियर्सकडून खेळला. मुथय्या मुरलीधरनच्या एका ओव्हरला १६ रन केल्यामुळे मोहनीश प्रकाशझोतात आला होता. पण एका वर्षानंतरच मोहनीशवर बीसीसीआयनं बंदी घातली. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये क्रिकेटची बदनामी केल्यामुळे मोहनीशवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. यानंतर २०१३-१४ च्या रणजी मोसमात मोहनीशनं मध्य प्रदेशकडून खेळताना शानदार पुनरागमन केलं आणि ५०१ रन केले होते.