Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला 'या' खेळाडूचा रामराम! 9 वर्षात 4 वेळा टीमला बनवलं चॅम्पियन

Mumbai Indians : 9 वर्षांच्या कारकिर्दीनंतर एका अनुभवी खेळाडूने मुंबई इंडियन्स संघाला रामराम ठोकलं आहे. या दिग्गज खेळामुळे मुंबई इंडियन्सला 4 वेळा आयपीएल चॅम्पियनचा बहुमान मिळाला होता.

नेहा चौधरी | Updated: Oct 18, 2023, 04:20 PM IST
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला 'या' खेळाडूचा रामराम! 9 वर्षात 4 वेळा टीमला बनवलं चॅम्पियन title=
IPL Shane Bond Parts Ways With Mumbai Indians After Nine Year Long Association

Mumbai Indians : सध्या वर्ल्ड कपचा (World Cup 2023) फिव्हर सुरु आहे. अशातच आयपीएल 2024 सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातील एका दिग्गज आणि अनुभवी खेळाडूने अचानक संघाला रामाराम केलं आहे. हा दिग्गज खेळाडू 2015 पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. या 9 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने मुंबई इंडियन्स संघाला  4 वेळा चॅम्पियन  बनवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं होतं. (IPL Shane Bond Parts Ways With Mumbai Indians After Nine Year Long Association)

कोण आहे हा खेळाडू?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण आहे, खेळाडू. तर आम्ही सांगतो तो खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय लीग T20 संघ एमआय एमिरेट्सचे प्रमुख शेन बाँड आहे. त्याच्या काळातील तो एक महान गोलंदाजांपैकी एक होता. गेल्या 9 वर्षांपासून तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. 

सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सने पोस्ट शेअर करत याबद्दल अपडेट दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की,  ''2015 मध्ये सुरू झालेला शेन बाँडचा यशस्वी कार्यकाळ संघासोबत 9 वर्षांनंतर संपला आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि एमआय एमिरेट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून 4 आयपीएल ट्रॉफींचा समावेश आहे.''

गूड बाय म्हणताना शेन म्हणाला...

शेन बाँड म्हणाला की, ''गेल्या नऊ सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल मी अंबानी कुटुंबाचं आभार मानतो. मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक छान आठवणी असलेला हा एक अविश्वसनीय अनुभव बनल्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे की, मला खेळाडू आणि कर्मचारी अशा अनेकांसोबत काम करण्याची संधी मिळाळी आणि त्यांच्याशी मजबूत संबंध निर्माण करता आले. मी त्या सर्वांना मिस करेन आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी MI पलटणचं विशेष आभार त्याने मला कायम पाठिंबा दिला. ''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बाँडची यशस्वी कारकीर्द

मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून 2015 मध्ये फ्रँचायझीमध्ये म्हणजे नीता अंबानी यांच्या कुंटुंबात सहभागी झाला होता. त्यानंतर  2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवण्यात देण्यात मोलाचा वाटा उचलला. शेन बाँड फ्रँचायझीच्या इतिहासातील महान प्रशिक्षकांपैकी त्याचा उल्लेख होतो. शेन बाँडने ILT20 च्या उद्घाटन हंगामात MI Emirates चे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. जिथे त्यांनी स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा अनुभव देण्यास विशेष मदत केली होती.