आयपीएल मॅच का अपमान? आयोजकांचा भोंगळ कारभार

आयपीएल प्ले ऑफच्या आधी महिला क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एका टी-20 मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: May 22, 2018, 05:33 PM IST
आयपीएल मॅच का अपमान? आयोजकांचा भोंगळ कारभार title=

मुंबई : आयपीएल प्ले ऑफच्या आधी महिला क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एका टी-20 मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅचमध्ये देश-विदेशातल्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंचा समावेश होता. पण या मॅचमध्ये आयोजकांचा ढिसाळ कारभार दिसून आला. दुपारी २ वाजता रणरणत्या उन्हामध्ये ही मॅच खेळवण्यात आली. तर महिला खेळाडूंना योग्य क्रिकेट किटही देण्यात आली नाही. टीमच्या ड्रेसचा रंग सारखा दिसण्यासाठी खेळाडूंच्या हेल्मेट आणि पॅडवर सारख्याच रंगाचं कापड घालण्यात आलं होतं. जिकडे पुरुष क्रिकेटपटूंना एका छोट्याशा मॅचसाठीही सगळ्या सुविधा पुरवल्या जातात पण महिलांना मात्र अशा सुविधा दिल्या जात असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. क्रिकेटपटूंचा हा अपमान असल्याची भावनही व्यक्त केली जात आहे.

कपड्यांबरोबरच या मॅचच्या आयोजनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंगळवारी म्हणजेच कामाच्या दिवशी ही मॅच खेळवण्यात आली. त्यातच दुपारी २ वाजताच्या उन्हामध्ये ही मॅच खेळवण्यात आल्यामुळे स्टेडियममध्येही प्रेक्षक उपस्थित नव्हते. महिला क्रिकेटला खरंच प्रोत्साहन द्यायचं असतं तर मॅचची तिकीटं फुकट ठेवण्यात आली असती तसंच काही शाळांच्या मुलांनाही बोलवता आलं असतं, अशी मतं व्यक्त होत आहेत. वानखेडे स्टेडियमवरच ७ वाजता चेन्नई आणि हैदराबादमध्ये आयपीएल प्ले ऑफचा सामना होणार आहे. महिला टीमला चीअर करण्यासाठी या टीमनाही लवकर बोलवता आलं असतं. पण महिला टीमच्या या सामन्याचं सोशल नेटवर्किंगवर हसं झाल्याचं पाहायला मिळालं.

सुपरनोवल आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यामध्ये ही मॅच खेळवण्यात आली. जगभरातल्या दिग्गज महिला क्रिकेटपटू ही मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरल्या.

आयपीएल ट्रेलब्लेजर्स

स्मृती मंधाना (कर्णधार), एलीसा हीले, सूजी बेत्स, दीप्ती शर्मा, बेथ मूनी, जेमीमाह रोड्रिगेज, डेनियल हेजल, शिखा पांडे, ली ताहुहु, झुलन गोस्वामी, एकता बिष्ट, पूनम यादव, डेलन हेमलता

आयपीएल सुपरनोवास

हरमनप्रीत कौर(कर्णधार), डेनियल वॅट, मिताली राज, मेग लानिंग, सोफी डेविने, एलीसे पॅरी, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूजा वास्त्राकार, मेगन स्कट, राजेश्वरी गायकवाड, अनुजा पाटील, तानिया भाटिया