मुंबई : भारतीय संघाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहली हा फीटनेस फ्रीक आहे.
विराट खेळाइतकेच स्वतःच्या फीटनेसकडे लक्ष देतो. आता विराटच्या पाऊलावर पाऊल ठेवत जसप्रित बुमराह यानेदेखील 'सिक्स पॅक्स अॅब' कमावले आहेत.
बुमराहने त्याच्या सिक्स पॅक अॅब्सचा खास फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शन टाकताना तुम्हांला सुधारण्यासाठी कठोर मेहनत गरजेची आहे. अशा आशयाचा खास संदेश लिहला आहे.
It takes dedication and hardwork to consistently improve yourself.#stayfit #RaiseTheBar pic.twitter.com/kHmOcwLut2
— Jasprit bumrah (@Jaspritbumrah93) November 17, 2017
भारतीत क्रिकेटर आता स्वतःच्या फीटनेसबाबतही अधिक जागृत झाले आहेत. भारतीय खेळाडूंचा फीटनेस सुधारण्यासाठी टीमचे ट्रेनर शंकर बासू अधिक प्रयत्नशीर असतात.
विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ खेळ सुधारण्यासाठी प्रयत्न करतोच आहे. पण यासोबतीने जिममध्येही अधिक घाम गाळताना दिसतोय.
भारताचा संघ सध्या श्रीलंकेविरोधात टेस्ट सीरीज खेळत आहे. कोलकत्त्यामध्ये पहिली टेस्ट मॅच सुरू आहे. या दौर्यात ३ टेस्ट मॅच खेळल्या जाणार आहेत.