Jasprit Bumrah : टीम इंडियावर 'संक्रांत'; बुमराह थेट आयपीएल खेळणार!

Jasprit Bumrah Update: बुमराहला विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय.

Updated: Jan 10, 2023, 04:40 PM IST
Jasprit Bumrah : टीम इंडियावर 'संक्रांत'; बुमराह थेट आयपीएल खेळणार! title=
Jasprit Bumrah

Jasprit Bumrah: सध्या श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या वनडे सिरीजमधून टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर पडला आहे. बुमराहच्या बाहेर जाण्याने टीम इंडियाला (India Cricket team) मोठा धक्का बसला आहे. अशातच आता बुमराह ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध खेळताना मैदानात दिसणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे बुमराह आता थेट आयपीएल (IPL) खेळणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत होता. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. (jasprit bumrah set to miss out on new zealand series and border gavaskar trophy will play ipl 2023 marathi news)

बुमराहला विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय. अशातच 100 टक्के फिट असलेला बुमराह 6 दिवसात पुन्हा अनफिट दिसून आला. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार बुमराह आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या 3 टी-ट्वेंटी तसेच 3 वनडे सामन्यात खेळणार नसल्यातं समजतंय. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर सामन्यात देखील बुमराह खेळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बुमराहला काही वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय. अशातच आता कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) चिंताजनक अपडेट दिली आहे. तर जसप्रीत बुमराहने पूर्ण मेहनत घेऊन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा त्याच्या पाठीत दुखणं जाणवत होतं, अशी माहिती रोहितने दिली होती.