WTC Finalमध्ये टीम इंडियासाठी न्यूझीलंडचे हे 3 खेळाडू डोकेदुखी ठरणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याला 18 जूनपासून सुरुवात होत आहे. 

Updated: Jun 17, 2021, 03:41 PM IST
WTC  Finalमध्ये  टीम इंडियासाठी न्यूझीलंडचे हे 3 खेळाडू डोकेदुखी ठरणार title=

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना (World Test Championship Final) शुक्रवारपासून खेळवण्यात येणार आहे. अजिंक्यपदासाठी टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या महामुकाबल्याचे आयोजन साऊथम्पटनमध्ये करण्यात आले आहे. या महत्वाच्या सामन्यात न्यूझीलंडचे 3 खेळाडू डोकेदुखी ठरु शकतात. हे 3 खेळाडू कोण आहेत, याबाबत जाणून घेऊयात. (Kane Williamson Trent Boult and  Neil Wagner will be dangerous for Team India in the final of the World Test Championship 2021) 

केन विलियमसन (Kane Williamson)

केन विलियमसनच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. केनवर फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी आहे. केन हा आघाडीचा सक्रीय फलंदाज आहे. केनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील 9 सामन्यात 58.35 च्या दमदार सरासरीने 817 धावा केल्या आहेत. विलियमसनने एकूण 84 कसोटी सामन्यांमध्ये  7 हजार 129 धावा केल्या आहेत. त्यामुळे केनला रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.

ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult)

टेन्ट बोल्ट न्यूझीलंडचा आघाडीचा आणि महत्वाचा गोलंदाज आहे. बोल्ट हा न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा मुख्य कणा आहे. ट्रेन्टने आपल्या स्विंग बॉलिंगने प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणलं आहे. बोल्टला साऊथम्पटनच्या खेळपट्टीकडून मदत मिळू शकते. ट्रेन्टने याआधी आपल्या गोलंदाजीने अनेकदा भारतीय फलंदाजांना त्रास दिला आहे. बोल्टने 72 टेस्ट मॅचमध्ये 287 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या बॅट्समन्सना बोल्टला जपूण खेळण्याचं आव्हान असणार आहे.  

नील वॅगनर (Neil Wagner)

 नील वॅगनर आपल्या शॉर्ट पिच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. वॅगरने आपल्या बॉलिंगने नंबर 1 बॅट्समन असेलला स्टीव्ह स्मिथला जेरीस आणलं आहे. टीम इंडिया 2020 न्यूझीलंड दौऱ्यावर होती. या दौऱ्यात वॅगनरने भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. वॅगनरने 53 कसोटी सामन्यांमध्ये 226 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया या तिन्ही खेळाडूंचा सामना कशा प्रकारे करते, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  
 
संबंधित बातम्या : 

WTC 2021 Final: भारतीय विकेटकीपर या दिग्गजांसोबत करणार कॉमेंट्री

WTC 2021: टीम इंडियाच्या कोचचा श्वानासोबत टेनिस सराव, व्हिडीओ व्हायरल