WTC 2021: टीम इंडियाच्या कोचचा श्वानासोबत टेनिस सराव, व्हिडीओ व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Updated: Jun 17, 2021, 02:33 PM IST
WTC 2021: टीम इंडियाच्या कोचचा श्वानासोबत टेनिस सराव, व्हिडीओ व्हायरल

मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना ड्युक बॉलनं खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्याआधी टीम इंडियाचे कर्णधार रवि शास्त्री यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की रवि शास्त्री एका श्वानासोबत टेनिसचा सराव करताना दिसत आहेत. 

या श्वानाचं नाव विंस्टन आहे. रवि शास्त्री या श्वानासोबत टेनिस खेळताना दिसत आहे. टेनिसचा बॉल टाकल्यानंतर श्वान धावत जाऊन तो बॉल पकडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

रवि शास्त्री यांनी या श्वानासोबत खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. ड्युक बॉलनं हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यावर खराब हवामानाचं संकट आहे. इतकंच नाही तर या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.