Asia Cup 2023 : येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धेचा शुभारंभ होतोय. आशिया खंडाचा चॅम्पियन कोण? याचं उत्तर 17 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे. त्यानंतर खेळला जाईल तो वनडे वर्ल्ड कप... आशिया कप स्पर्धा (Asia Cup 2023) ही वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असेल, यात काही शंका नाही. अशातच आता आशिया कपपूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. आशिया कप सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता निवडलेल्या खेळाडूंची यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) करण्यात आली. मात्र, यो-यो टेस्टनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
फक्त 4 दिवस बाकी असताना आता टीम इंडियाचं सराव शिबिर सुरू आहे. यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये शुभमन गिलने बाजी मारली. 19.1 स्कोर करत शुभमनने 17.2 स्कोर करणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकलं आहे. तर दुसरीकडे दुखापतीतून सावरलेल्या के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांची यो-यो टेस्ट घेण्यात आली नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्यामुळेच आता रोहित शर्माची चिंता वाढलेल्याचं पहायला मिळतंय. आता दोन मॅचविनर खेळाडू आशिया चषकातून बाहेर पडू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आशिया कप सामना खेळण्यासाठी यो-यो टेस्ट पास करणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत खेळाडूची फिटनेस टेस्ट होत नाही तोपर्यंत तो खेळू शकत नाही. राहुलने नेट्समध्ये थोडा फलंदाजीचा सराव केला, पण त्याने धावण्याचा सराव मात्र केला नाही. त्यामुळे आता 6 दिवसात राहुल आणि श्रेयस अय्यर यांची फिटनेस टेस्ट होणार का? झाली तर दोघंही टीम इंडियासाठी आशिया कप खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे. इशान किशन असेल किंवा संजू सॅमसन सारखे खेळाडू खेळण्यासाठी तयार असताना बीसीसीआय लंगड्या गाईवर डाव का खेळतंय? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला येत्या 2 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यात केएल राहुल खेळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत अजित आगरकर यांनी दिले होते. त्यानंतर नेपाळविरुद्ध 4 सप्टेंबरला सामना आहे. त्यानंतर 10 किंवा 12 सप्टेंबरला सामना होईल. त्यानंतर 17 तारखेला फायनल सामना खेळवला जाणार आहे.