मुंबई : इसिस आणि अनेक दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीनंतर पोर्तुगाल स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने रुसमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपसाठी दोन खास व्यक्तींना बॉडीगार्ड बनवलं आहे. यामध्ये एक बुलफायटर असून खूप ताकदवान आहे. हा बॉडीगार्ड उघड्या हातांनी अर्धा टन वजनाच्या बुल शी थेट भिडतो. नुनो मारेकोस असे या ख्रिस्तियानोच्या बॉडीगार्डचे नाव आहे. ख्रिस्तियानोला सुरक्षा देणारा नुनो हा काही एकटाच बॉडीबिल्डर नाही. त्याच्या सोबत एक एमएमए फायटर देखील आहे. गोनकालो सलगादो असे या बलवान फायटरचे नाव आहे. नुकच्याच झालेल्या चॅंपियन्स लीगच्या फायनलमध्ये हे दोन्ही बाहुबली दिसले होते. बुलफायटर असलेला नुनो एका ग्रुपमधून बुलशी भिडतो. सर्वात विशेष म्हणजे जेव्हा भिडंत होते तेव्हा तो सर्वांच्या पुढे आणि बुलच्या समोर असतो.
रोनाल्डोचा दुसरा बॉडीगार्ड दोनकालो सलकादो हा ६ फूट २ इंच उंचीचा आहे. तो अनेक इंटरनॅशनल सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड राहिला आहे. फिफा वर्ल्डकप सुरू होण्याआधीपासूनच इसिस सारख्या अनेक दहशतवादी संघटनांनी रोनाल्डो आणि मेसी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.