पाल्लेकेले : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १७१ रन्सनं विजय झाला. याचबरोबर भारतानं तीन टेस्ट मॅचची सीरिज ३-०नं जिंकली. परदेशी जमिनीवर सीरिजमधल्या तिन्ही टेस्ट मॅच जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये कुलदीप यादवनं ४० रन्सच्या मोबदल्यात ४ विकेट घेऊन श्रीलंकेच्या इनिंगला १३५ रन्सवर संपवलं. यामुळे कोहलीनं श्रीलंकेला फॉलो ऑन द्यायचा निर्णय घेतला.
Great stop by @ashwinravi99 and Brilliant from @imkuldeep18 pic.twitter.com/6FCvOtODgW
— Black (@MrBlackTweet) August 13, 2017
— Yograj Singh (@Cricvids1) August 13, 2017
दुसऱ्या इनिंगमध्ये कुलदीपनं एक विकेट घेतली. पण या टेस्टमध्ये कुलदीपनं दाखवलेल्या चपळतेनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी कुलदीपनं कुशल मेंडिसला रन आऊट केलं.
दिनेश चंडीमलनं मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मिड ऑनला फटका मारला. अश्विननं तो बॉल अडवून शमीकडे फेकला पण शमीनं तो बॉल हातात घेतला नाही. यावेळी फॉलोअपला कुलदीप शमीच्या मागे उभा होता. कुलदीपनं तो बॉल अडवून स्टम्पवर मारला आणि कुशल मेंडिस रनआऊट झाला.