नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम बॉलर अशी ख्याती असलेल्या शेन वॉर्न ने भारतीय गोलंदाजाची स्तुती केली आहे. हा जगातील सर्वोत्तम बॉलर होऊ शकतो असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. तो कुलदिप यादवबद्दल बोलत होता. २२ वर्षीय कुलदीप यादवने मालिकेतील चार सामन्यांमध्ये एकूण सात विकेट्स घेतले. यामध्ये एका हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.
Was a pleasure to meet young Kuldeep when I was last in India. I really enjoy watching him bowl & cause confusion, even against Oz #INDvAUS
— Shane Warne (@ShaneWarne) October 1, 2017
‘जर कुलदीपने सर्व फॉरमॅटमध्ये संयम ठेवत गोलंदाजी केली, तर तो जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरच्या जागेवरुन यासिरला हटवू शकतो’ असं शेन वॉर्नने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे.‘गेल्यावेळी मी जेव्हा हिंदुस्थानात होतो, तेव्हा कुलदीप यादवला भेटलो होतो. ज्याप्रकारे कुलदीप यादव गोलंदाजी करत फलंदाजांना गोंधळवून टाकतो, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही.. ते कमाल आहे’असेही त्याने म्हटले आहे.
सामना संपल्यानंतर कुलदीप यादवने “माझ्यासाठी ही मालिका कठीण होती.
If young Kuldeep remains patient when he’s bowling in all forms then he could challenge Yasir as the best leg spinner in the world & quickly
— Shane Warne (@ShaneWarne) October 1, 2017
पहिल्या सामन्याआधी मी चांगली तयारी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांविरोधात गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नव्हती. कसोटीत पदार्पण केल्यानंतर माझ्यासाठी गोष्टी बदलल्या आहेत. मला अनेक संधी मिळात आहेत. विजेत्या संघाचा भाग असणं चांगली गोष्ट आहे” असं सांगितले.