मोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाणार?

भारताचा फलंदाज मोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाण्याची शक्यता आहे. रणजी सामन्यांसाठी छत्तीसगड संघाचा कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून सध्या कैफची नियुक्ती करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 27, 2017, 01:32 PM IST
मोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाणार? title=

मुंबई : भारताचा फलंदाज मोहम्मद कैफ अफगाणिस्तानला जाण्याची शक्यता आहे. रणजी सामन्यांसाठी छत्तीसगड संघाचा कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून सध्या कैफची नियुक्ती करण्यात आलेय.

कैफची अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या हे पद लालचंद राजपूत यांच्याकडे आहे. परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात तेथील क्रिकेट मंडळाने राजी नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कैफ हा सध्याच्या घडीला त्यांच्या संघासाठी चांगला प्रशिक्षक ठरू शकेल असं त्यांना वाटत आहे. तसेच ते नव्या प्रशिक्षकासाठी क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत आहे. तसा शोध सुरु असल्याचे वृत्त आहे.

२००२ साली इंग्लंड विरूद्धच्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कैफने तडाखेबाज ८७ धावांमुळे भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. कैफ भारताकडून १३ कसोटी सामने आणि १२५ एकदिवसीय सामने खेळला आहे.