क्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर

क्रिकेटर प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा गंभीर अपघात झालाय. 

Updated: Sep 30, 2017, 06:40 PM IST
क्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर title=

मेरठ : क्रिकेटर प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा गंभीर अपघात झालाय. 

बागपत रोडजवळ हा अपघात घडलाय. भरधाव वेगानं जाणाऱ्या एका कारनं मूर्तीदेवी यांना जोरदार धडक दिली. इतकंच नाही तर अपघातानंतर गाडीचालक फरार झाला. 

मेरठच्या मुल्तान नगरमध्ये राहणाऱ्या प्रवीण कुमार याच्या आईची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. त्यांना केएमसी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

प्रवीणचा भाऊ विनय कुमारनं दिलेल्या माहितीनुसार, वडील सकत सिंह आणि आई मूर्तीदेवी या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाईकवरून निघाले होते. याच दरम्यान मागून सुस्साट येणाऱ्या कारनं मूर्तीदेवी यांना जोरदार धडक दिली.