PBKS vs MI : पलटणने घेतला वानखेडेवरील पराभवाचा बदला, 6 विकेट्सने पंजाबला चारली धूळ

PBKS vs MI : अखेर मुंबईने इंडियन्सच्या टीमने वानखेडेवर झालेल्या पराभवाचा बदला घेतला. मुंबईने 6 विकेट्सने पंजाबचा पराभव केला आहे. 

Updated: May 3, 2023, 11:34 PM IST
PBKS vs MI : पलटणने घेतला वानखेडेवरील पराभवाचा बदला, 6 विकेट्सने पंजाबला चारली धूळ title=

PBKS vs MI : मोहालीच्या मैदानावर आज पंजाब किंग्ज (Punjab kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai indians) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेट्सने पंजाबवर विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईच्या टीमने वानखेडेवर (wankhede) झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईच्या टीमने 215 रन्सचं टार्गेट पूर्ण केलं. 

इशान आणि सूर्याने खेचून आणला विजय

मुंबईच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरलेत ते म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) . या दोन्ही खेळाडूंनी मुंबईच्या टीमला विजय मिळवून दिला. इशानने (Ishan Kishan)  41 बॉल्समध्ये 75 रन्स केले. यामध्ये त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले. तर दुसऱ्या बाजूने सूर्याची (Suryakumar Yadav) बॅट देखील तळपली. सूर्यकुमारने 31 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी केली. सूर्याने 8 फोर आणि 2 उत्तुंग सिक्स मारले.

रोहित शर्मा पुन्हा फेल

215 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit sharma) आज भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्माची (Rohit sharma) आज मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indians) खेळतानाची 200 वी मॅच होती. मात्र या सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. याशिवाय कॅमेरून ग्रीनलाही मोठी खेळी करता आली नाही. 

रोहित (Rohit sharma) आणि ग्रीन आऊट झाल्यानंतर सूर्या आणि इशान क्रीजवर होते. या दोघांनीही मुंबईला जिंकवून देण्याच्या उद्देशाने उत्तम फलंदाजी केली. मात्र विजय जवळ आल्यानंतर दोघांनीही विकेट गमावली. अखेरीस टीम डेविड ( tim david ) आणि तिलक वर्मा यांनी सामना जिंकवून दिला. 

जीतेश शर्मा आणि लिविंगस्टोनची खेळी व्यर्थ

पंजाबच्या फलंदाजीनीही आज मुंबईच्या फलंदाजांना चांगलाच चोप दिलाय. 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जितेश शर्माने सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केवी. जितेशने 27 बॉल्समध्ये 49 रन्सची खेळी केली. जितेशला यावेळी लिव्हिंगस्टोनची साथ मिळाली. त्याने 82 रन्सची शानदार नाबाद खेळी खेळली. यामध्ये 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. या दोघांच्या खेळीमुळे पंजाबला 200 पार रन्स करता आले. मात्र दोघांच्याही मेहनतीवर इशान आणि सूर्याने पाणी फेरलं.