Virat Kohli नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर #SunoKohli ट्रेंड, नक्की कारण काय?

 विराट कोहली (Virat Kohli) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. नेटीझन्स विराटवर सडकून टीका करत आहेत.  

Updated: Oct 18, 2021, 06:02 PM IST
Virat Kohli नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर #SunoKohli ट्रेंड, नक्की कारण काय? title=

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर टी 20 क्रिकेट वर्ल्ड स्पर्धेला (ICC T 20 World Cup 2021) सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यूएई आणि ओमानमध्ये करण्यात आलंय. ही वर्ल्ड कप स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान विराट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. नेटीझन्स विराटवर सडकून टीका करत आहेत. यामुळे सोशल मीडियावर #SunoKohli ट्रेंड होतोय. (netizens troll to indian cricket team captain virat kohli over to diwali video messege)

नक्की कारण काय? 

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळीआधी अनेक सेलिब्रिटीज हे वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडू नयेत, असं  विविध माध्यमातून आवाहन करतात. विराटनेही अशाच प्रकारे एका व्हीडिओद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावरुन या सर्व वादाला तोंड फुटलंय.

विराटने हा व्हीडिओ ट्विट केला आहे. "'भारत आणि जगभरातील लोकांसाठी हे वर्ष खूप कठीण गेलं. प्रत्येकजण दिवाळीची वाट पाहत आहे. मी तुम्हाला तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत दिवाळी कशी साजरी करायची आणि हा सण सार्थक कसा बनवायचा याबद्दल काही टिप्स देईन", असं विराट या व्हीडिओत म्हणाला. या वरुन नेटकऱ्यांनी विराटला धारेवर धरलंय. तसंच विराटला लोकांनी आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. 

काही नेटझन्सनी विराटला दिवाळीत फटाके फोडतानाचे फोटो ट्विट केले आहेत. अनेक नेटकरी हे #SunoKohli हा हॅश्टॅग वापरुन आपली बाजू मांडत आहेत. त्यामुळे हा हॅश्टॅग ट्रेंड होतोय.  दरम्यान 2020 मध्ये विराट अशाच प्रकारे ट्रोल झाला होता.