अनुष्का आणि विराटचा हा फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांची प्रेम कहानी सर्वांनाच माहिती आहे. दोघांनीही आतापर्यंत या प्रेमासंदर्भात उघडपणे भाष्य केलेलं नाहीये. आपलं खासगी आयुष्य त्यांनी नेहमीच मीडियापासून दूर ठेवलं. पण आता या दोघांचा एक फोटो समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 25, 2017, 11:51 PM IST
अनुष्का आणि विराटचा हा फोटो होतोय व्हायरल  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांची प्रेम कहानी सर्वांनाच माहिती आहे. दोघांनीही आतापर्यंत या प्रेमासंदर्भात उघडपणे भाष्य केलेलं नाहीये. आपलं खासगी आयुष्य त्यांनी नेहमीच मीडियापासून दूर ठेवलं. पण आता या दोघांचा एक फोटो समोर आला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या दोघेही श्रीलंकेत आहेत. विराट कोहली हा आपल्या क्रिकेट मॅचेससाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. तर अनुष्काही श्रीलंकेतच दाखल झाली आहे.

नुकताच दोघांचा एकत्र असलेला फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियात व्हायरलही होत आहे. या फोटोमध्ये दोघं एकत्र जेवण करताना दिसत आहेत.

Anushka Sharma, Virat Kohli

Image Courtesy: Instagram 

 

Recent day out around these gentle giants!  Such innocence and playfulness was blissful to see.

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 

A day spent with elephants ... is a day spent well ! 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

दरम्यान या दोघांनीही यापूर्वी आयफा अवॉर्ड्स दरम्यान न्यूयॉर्कमध्ये एकत्रित सुट्टी एन्जॉय केली होती. त्यावेळीही दोघांचे फोटोज समोर आले होते. ज्यामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एका स्टोअरमध्ये पहायला मिळाले होते.

दरम्यान, विराट कोहलीने आपल्या नात्याबाबत अद्याप उघडपणे भाष्य केलेलं नाहीये. तर अनुष्कानेही अद्याप काहीही म्हटलेलं नाहीये.