नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेत्रृत्वाखाली गुरुवारपासून सुरु होणाऱ्या निडास टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
६ मार्चपासून श्रीलंकेत निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
या सीरिजमध्ये कॅप्टन विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी यांच्यासोबत इतरही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ६ मार्चपासून टूर्नामेंटला सुरुवात होणार आहे तर शेवटची मॅच १८ मार्च रोजी खेळली जाणार आहे.
या ट्राय सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्यात एक स्पर्धा पहायला मिळण्याची शक्यता आहे. रोहितने आतापर्यंत २६५ टी-२० मॅचेसच्या २५३ इनिंग्समध्ये एकूण २८१ सिक्सर लगावले आहेत. तर, सुरेश रैनाने २७१ मॅचेसमध्ये २५७ इनिंग्स खेळत २७८ सिक्सर लगावले आहेत. म्हणजेच रैना हा रोहित शर्माच्या सिक्सरच्या रेकॉर्डपेक्षा थोड्या फरकाने मागे आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये सर्वाधिक सिक्सर कुणाच्या नावावर जातात हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, के.एल.राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्सर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रिशभ पंत(विकेट कीपर)