Rohit Sharma: IPLमध्ये 'या' टीमकडून रोहित शर्माला ऑफर? कोचच्या विधानाने चर्चांना उधाण

IPL 2024: आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी रोहित LSG मध्ये येण्याच्या शक्यतेवर मोठं विधान केलंय.

सुरभि जगदीश | Updated: Apr 10, 2024, 10:37 AM IST
Rohit Sharma: IPLमध्ये 'या' टीमकडून रोहित शर्माला ऑफर? कोचच्या विधानाने चर्चांना उधाण title=

IPL 2024: इंडियन प्रिमीयर लीग सुरु झाली असून मुंबई इंडियन्सच्या टीमकडे सर्व खेळाडूंचं लक्ष आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई टीमच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधार करण्यात आलं. त्यामुळे रोहित शर्मा नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्मा मुंबई सोडणार, असा दावा करण्यात येतोय. तर आता रोहित लखनऊ सुपर जाएंट्समध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.  

आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी रोहित LSG मध्ये येण्याच्या शक्यतेवर मोठं विधान केलंय. IPL 2025 मेगा ऑक्शनमध्ये सर्व खेळाडू बोली लावण्यासाठी उपलब्ध असतील. अशावेळी रोहित शर्माचा त्यांच्या टीममध्ये समावेश करायला आवडेल असं जस्टिन लँगरला विचारण्यात आले. दरम्यान लँगरच्या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली. याचं कारण त्यांनी रोहित शर्मासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये.

पुढील वर्षीच्या मेगा लिलावात रोहित शर्माची निवड करण्याच्या शक्यतेबद्दल बोलताना एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले, "मला रोहित शर्माची निवड करायला आवडेल. आम्ही त्याला मुंबई इंडियन्सकडून या ठिकाणी आणू. सौदा चांगला असणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून इथे येईल असं मला वाटत नाही. आयपीएलमधील रोहित शर्माचं मूल्य त्याला माहीत आहे, कारण तो केवळ मोठे सिक्स मारण्यास सक्षम नाही तर तो जागतिक दर्जाचा कर्णधारही आहे. 

पुढच्या वर्षी मुंबईची साथ सोडणार रोहित शर्मा?

आयपीएल 2024 ही अनेक कारणांमुळे चर्चेत ठरतेय. रोहित शर्मा हा सीझन सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आला होता. त्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर जगभरातील 'हिटमॅन'चे चाहते निराश झाले. यामुळे मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला खूप ट्रोल करण्यात येतंय. इतकंच नाही तर रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेदाच्या बातम्याही समोर येणार आहेत. रोहित शर्मा आयपीएल 2024 च्या शेवटी मुंबई इंडियन्स सोडू शकतो. त्यामुळे मुंबईला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा मेगा लिलावात ऑक्शनसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.