SL vs PAK: 14 सप्टेंबर रोजी श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान ( SL vs PAK ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये श्रीलंकेने बाजी मारली. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यामध्ये अखेर श्रीलंकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला. या सामन्यामध्ये टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ( Babar Azam ) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात बाबर आझमने एक चूक केली ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या पदरी पराभव पडला.
पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 42 ओव्हर्समध्ये 252 रन्स केले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने झंझावाती खेळी केली. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना कुसल मेंडिसने 91 रन्सची खेळी केली. अखेरीस चरित असलंकाने 49 रन्स करत श्रीलंकेच्या टीमला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं.
पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानचा सुपर-4 मधला सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. पावसामुळे हा सामना उशीरा सुरु झाल्याने 2 ओव्हर्स खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाला. सामन्याच्या पाचव्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानाच ओपनर फखार झमान बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आझमही फार काळ मैदानावर टीकला नाही.
अब्दुल्ला शफीकने झुंजार 50 रन्स केले. त्यानंतर मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाझ यांनीही स्वस्तात पव्हेलियनचा रस्ता धरला. 130 रन्सवर पाच विकेट अशी पाकिस्तानची अवस्था झाली. मात्र यावेळी मोहम्मद रिझवान आणि इफ्तिकार अहमदने यांनी तुफान फटकेबाजी करत लंकेच्या गोलंदाजांची हवा काढली.
विजयासाठी 252 रन्सचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात दमदार झाली. निसांका आणि परेराने पहिल्या ओव्हरपासून आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. परेरा 17 धावांवर बाद झाला. तर दमदार फलंदाजी करणारा निसांकाही शादाबच्या गोलंदाजीवर आऊट झाला. त्यानंतर कुसाल मेंडिस आणि समरविक्रमाने डाव सावरला. या दोघांनी शंभर रन्सची पार्टनरशीप केली. शाहीन आफ्रिदीने 41 व्या ओव्हरमध्ये सलग दोन विकेट घेत श्रीलंकेला मोठा धक्का दिला. पण शेवटच्या ओव्हरमध्ये असलंकाने बाजी फिरवत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.
एशिया कप 2023 मध्ये बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता का, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा ही जोडी फलंदाजीमध्ये पार्टनरशिप करत असताना बाबरने प्रभावी गोलंदाज शाहीन आफ्रिदीला संधी न देऊन फिरकी गोलंदाजांना बॉल सोपवला. यावेळी शादाब खानने 9 ओव्हरमध्ये 55 रन्स दिले तर इफ्तिखार अहमदने 50 रन्स दिसे. त्यामुळे बाबर आझमकडून झालेल्या या चुकीमुळे पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढावली.