बाबर आझमने तोडला विराट कोहलीचा 'हा' रेकॉर्ड

अनेक वादांमध्ये अडकलेले पाकिस्तानचे क्रिक्रट विश्व आता पुन्हा मूळ पदावर येण्यास सुरूवात झाली. सध्या युएईमध्ये श्रीलंकेविरोधात एकदिवसीय सामने सुरू आहेत. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर पाकिस्तान संघाने विजय मिळवला आहे.

Updated: Oct 14, 2017, 01:20 PM IST
बाबर आझमने तोडला विराट कोहलीचा 'हा' रेकॉर्ड title=

युएई : अनेक वादांमध्ये अडकलेले पाकिस्तानचे क्रिक्रट विश्व आता पुन्हा मूळ पदावर येण्यास सुरूवात झाली. सध्या युएईमध्ये श्रीलंकेविरोधात एकदिवसीय सामने सुरू आहेत. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर पाकिस्तान संघाने विजय मिळवला आहे.

पाकिस्तानच्या या विजयी कामगिरीप्रमाणेच या सामन्यात फलंदाज बाबर आजम याने दमदार शतक ठोकले आहे. जगभरात वेगवान शतक बनवण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे. पण कोहलीला तगडी स्पर्धा देण्यासाठी बाबर आजम हा पाकिस्तानी फलंदाजही तयार आहे. 

दुबईत श्रीलंकेविरोधात एक दिवसीय सामन्यात बाबरने 103 धावा करत त्याच्या करिअरमधील सहावे शतक ठोकले आहे. विराटचया दुप्पट वेगाने बाबर शतकांची खेळी करत आहे. बाबर आजमलादेखील क्रिक्रटचे फॅन्स पाकिस्तानचा विराट कोहली म्हणतात. 

२२ वर्षीय बाबर आजमने १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८८६ धावा केल्या आहेत. इतक्या कमी वयात हा धावांचा टप्पा पार करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. २५ सामान्यांमध्ये १३०६ धावा करण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० धावा वेगवान धावादेखील बाबरनेच बनवल्या आहेत. लागोपाठ ३ वनडे शतक बनवणारा बाबर हा दुसरा युवा खेळाडू आहे.