Shahid Afridi | शाहिद आफ्रिदी 'दादा'वर संतापला, पण नक्की कारण काय?

कर्णधारपदावरुन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci Chief Sourav Ganguly) आणि विराट कोहली यांच्यात  वाद निर्माण झाला होता. 

Updated: Dec 23, 2021, 03:23 PM IST
Shahid Afridi | शाहिद आफ्रिदी 'दादा'वर संतापला, पण नक्की कारण काय?  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला (Virat Kohli) बीसीसीआयने (Bcci) एकदिवसीय कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार होण्याचे आदेश दिले. त्यानंतर विराटने टी 20 नंतर वनडे संघाचं (Odi Captaincy) कर्णधारपद सोडलं. विराटनंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. (pakistan former captain shahid afridi slams bcci president sourav ganguly over to captaincy controversy in virat kohli and rohit sharma)

या सर्व प्रकरणावरुन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci Chief Sourav Ganguly) आणि विराट कोहली यांच्यात  वाद निर्माण झाला. या वादात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) उडी घेतली आहे. आफ्रिदीने विराटची बाजू घेत दादावर सडकून टीका केली आहे. तसेच संतापही व्यक्त केलाय.

आफ्रिदी काय म्हणाला? 

आफ्रिदीने गांगुलीवर संताप व्यक्त करत चांगलीच खरी-खोटी सुनावली. "बीसीसीआयमध्ये निर्माण झालेला वाद योग्यरित्य हाताळता आला असता. क्रिकेट बोर्डाची भूमिका नेहमीच निर्णायक आणि महत्त्वाची असते, असं मी नेहमीच म्हणत आलोय. सिलेक्शन कमीटीने खेळाडूला कोणत्याही गोष्टीबद्दल स्पष्ट सांगावं, की आमची अमूक अमूक अशी योजना आहे जी टीमसाठी पूरक आहे.  विराट आणि गांगुलीने एकत्र बसून बोलायला हवं. माध्यमांसमोर या अशा मुद्द्यांमुळे वाद निर्माण होतात", असं आफ्रिदीने सांगितलं. तो एका वृत्तवाहिनीशी बोलत होता.  

यामुळे पेटला वाद

बीसीसीआयने विराटला वनडे कॅप्टन्सीवरुन काढलं. त्यानंतर रोहितला ही जबाबदारी सोपवण्यात आली. विराटने यानंतर पत्रकार परिषद घेतली. विराटने या पत्रकार परिषदेत काही मुद्दे मांडले. मला टी 20 संघाचं नेतृत्व सोडू नको, असं कोणीही म्हंटलं नाही. तर वनडे कॅप्टन्सी सोडण्यासाठी माझ्याशी संपर्क केला गेला, असं विराट म्हणाला होता.

तर मी वैयक्तिकरित्या विराटला टी 20 कॅप्टन्सी सोडू नकोस, असं गांगुली म्हणावा होता. यावरुन या कर्णधारपदाच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलं होतं.