मुंबई: जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. आता वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना सर्वतोपरी काळजी घेऊन क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. नुकतान भारत विरुद्ध न्यूझिलंडचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यानंतर खेळवला जाणार PSL लीनच्या अंतिम सामन्याआधी मोठी बातमी सामोर आली आहे.
बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी 2 खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पेशावर झल्मीचे हैदर अली आणि उम्मेद आसिफ यांना आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल मुल्तान सुल्तानविरूद्ध पीएसएल फायनलमधून निलंबित करण्यात आलं. मागच्या वेळी देखील बायो बबलचं उल्लंघन केल्या प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आलं होतं.
पाकिस्तान सुपर लीगने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, दोन्ही खेळाडूंनी बायो बबलचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हा आरोप दोन्ही खेळाडूंनी मान्य केला असून त्यांच्यावर PSL कडून करवाई करण्यात येत आहे. त्यांना अंतिम सामन्यात खेळता येणार नाही. हैदरला इंग्लंड आणि वेस्टइंडिज दौऱ्यापासून देखील बाहेर ठेवण्यात आलं आहे.
बायो बबलचं उल्लंघन खेळाडूंनी बुधवारी केलं होतं. गुरुवारी त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात आली. UAEमध्ये सध्या पाकिस्तानी लीगचे सामने सुरू आहेत. अंतिम सामन्याआधी हा मोठा निर्णय घेण्यात आला. बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यानं 4 मे रोजी IPLचे 31 सामने स्थगित करावे लागले होते.
IPLचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. हे सामने UAEमध्ये होणार असून बायो बबलही अति कडक असेल असं सांगण्यात आलं आहे.