राजकारणाला खेळापासून दूर ठेवा; भारत-पाक सिरीजसाठी पाहा कोण घेतंय पुढाकार?

भारत आणि पाकिस्तानमधील यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे गेल्या 9 वर्षांपासून या दोन देशांमध्ये क्रिकेटची एकही मालिका खेळली गेली नाही.

Updated: Oct 21, 2021, 07:07 AM IST
राजकारणाला खेळापासून दूर ठेवा; भारत-पाक सिरीजसाठी पाहा कोण घेतंय पुढाकार? title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे गेल्या 9 वर्षांपासून या दोन देशांमध्ये क्रिकेटची एकही मालिका खेळली गेली नाही. हे दोन संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध येतात. मात्र आता भारत पाक सिरीज होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण आता पीसीबीने मैत्रीचा हात पुढे केला आहे.

संबंध मजबूत करण्यासाठी पीसीबीचा पुढाकार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणाले की, दोन देशांमधील सर्वात आवडत्या खेळाचा संबंध सुधारण्याची वेळ आली आहे. पीसीबी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजकारण खेळापासून दूर ठेवून क्रिकेट बंधन निर्माण केलं पाहिजे.

सौरव गांगुलीशी भेट

रमीज म्हणाले, "मी एसीसी (एशिया क्रिकेट कौन्सिल) बैठकीच्या वेळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची भेट घेतली. आम्हाला क्रिकेटचे बंध निर्माण करण्याची गरज आहे. तर राजकारणाला शक्य तितकं खेळापासून दूर ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. ही नेहमीच आमची भूमिका राहिली आहे. 

आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. जे या स्पर्धेतील सर्वात मोठा क्रिकेट सामना मानला जातोल. देशाच्या सुरक्षेच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मैदानावर परत आणण्यासाठी पाकिस्तान धडपडत आहे. नुकतंच, न्यूझीलंड आणि इंग्लंडने सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानचे दौरे रद्द केले.