मुंबई : आयपीएलचे सामने रोमांचंक होत आहेत. पंधराव्या हंगामात 10 टीममध्ये चुरशीची लढत सुरू आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली टीमला पॉईंट टेबलमध्ये मागे सारून नव्या टीम जोमाने पुढे जात आहेत. आयपीएल सुरू होऊन 2 आठवडे आणि 16 सामने झाले आहेत. यामध्ये यंदा नव्या कर्णधारांनी कमालीची कामगिरी केली.
ज्यांना कर्णधारपदाचा अनुभवही नव्हता अशा क्रिकेटपटूंना यंदा चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये बंगळुरू आणि चेन्नई टीम अजूनही तेवढी चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरली नसली तरी एकदा या नव्या कर्णधारांचं रिपोर्ट कार्ड जाणून घेऊया.
हार्दिक पांड्या- यंदा नव्यानेच आयपीएलमध्ये गुजरात टीम आली. गुजरात टीमची धुरा हार्दिक पांड्यावर देण्यात आली. हार्दिकने पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात तिन्हीच्या तिन्ही सामने गुजरात टीम जिंकली आहे. पॉईंट टेबलवर गुजरात टीम दुसऱ्या स्थानावर आहे.
मयंक अग्रवाल- पंजाबने यावेळी कर्णधारपदाची धुरा मयंक अग्रवालच्या खांद्यावर दिली आहे. याआधी के एल राहुल गेल्या हंगामात कर्णधार होता. मयंकने चांगल्या पद्धतीनं कर्णधारपदाची धुरा सांभाळली. पंजाबने 2 सामने जिंकले तर 2 गमवले आहेत. ही टीम प्ले ऑफपर्यंत पोहोचू शकते असा विश्वास चाहत्यांना आहे.
रविंद्र जडेजा- धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. जडेजाला तीन सामन्यापैकी एकामध्येही विजय मिळवण्यात यश आलं नाही. जडेजासाठी कर्णधारपदाचा अनुभव नवखा आहे. हैदराबाद विरुद्ध चौथा सामना आज खेळवला जात आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.