BCCI Review Meeting: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI ने 1 जानेवारी रोजी एक बैठक होती. मुंबईच्या एका हॉटेलमध्ये जवळपास 4 तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती. जाणून घेऊया या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले गेले
बीसीसीआयने आज म्हणजेच 1 जानेवारीला एक महत्त्वाची बैठक घेतली. मुंबईतील एक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास 4 तास ही बैठक चालली. यामध्ये भारतीय टीम (Team India) चे हेड कोच राहुल द्रविड, नियमित कर्णधार रोहित शर्मा, एनसीए हेड व्ही व्ही एस लक्ष्मण तसंच चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांना समावेश होता. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
असं म्हटलं जातंय की, आज या बैठकीत चेतन शर्मा देखील उपस्थित होते. त्यामुळे चीफ सिलेक्टरचं पद पुन्हा एकदा तेच सांभाळण्याची शक्यता आहे. सध्या फोकस हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर आहे. यामध्या टीम इंडिया फायनल गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. याशिवाय 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप देखील होणार आहे. नवा टी-20 कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या बैठकीसाठी उपस्थित नव्हता.
भारत यंदाच्या वर्षी 2023 मध्ये वनडे वर्ल्डकपचं यजमानपद भूषवणार आहे. वर्ल्डकपपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय एक्टिव्ह मोडमध्ये आहे. याचसाठी बीसीसीआयने रविवारी एक बैठक घेतली. बीसीसीआयने या आढावा बैठकीमध्ये 20 खेळाडूंची नावं शॉर्टलिस्ट केलीयेत.