India Vs South Africa One Day Series: आशिया कप 2022 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाने दोन मालिकांमध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे. टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. तत्पूर्वी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. तीन सामन्यांची मालिका उद्यापासून (गुरुवार) सुरु होत आहे. या मालिकेसाठी कर्णधारपद शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) सोपण्यात आलं आहे. पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घेऊयात
दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत बॉलिंग लाइनअप विरुद्ध भारत फक्त 5 फलंदाज खेळवण्याचा धोका पत्करणार नाही. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघ सहा फलंदाजांसह सज्ज असेल. सलामीला शिखर धवन आणि शुबमन गिल जोडी मैदानात उतरेल. तिसऱ्या गड्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज असेल. त्याचबरोबर इशान किशन, संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांच्या खांद्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.
दक्षिण आफ्रिकेन संघात रीझा हेंड्रिक्स हा T20 संघातील रिले रॉसॉवची जागा घेईल. T20 विश्वचषक 2022 च्या तयारीसाठी अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस संघात स्थान दिलं जाईल. त्याच्यासोबत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या वेन पारनेल आणि केशव महाराज यांना सपोर्ट बॅटर्स म्हणून संधी मिळेल.
भारताची संभावित प्लेईंग 11: शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद, दीपक चाहर, आवेश खान, रवि बिष्णोई, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिकेची संभावित प्लेईंग 11: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शाम्सी