"देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळणे महत्त्वाचं झालंय", या दिग्गजाने टीम इंडियाला फटकारलं

टीम इंडियाने (Indian Cricket team) टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये (T 20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरी केली. यावरुन दिग्गजाने संताप व्यक्त केला आहे.  

Updated: Nov 8, 2021, 03:17 PM IST
"देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळणे महत्त्वाचं झालंय", या दिग्गजाने टीम इंडियाला फटकारलं title=

यूएई : टीम इंडियाचं (Indian Cricket Team) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2021) आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं. विराटसेना अवघे 4 सामने खेळूनच स्पर्धेतून बाहेर झाली. टीम इंडिया 2012 नंतरच्या वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेच्या बाद फेरीत (Knock Out Round) पोहचू शकली नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) टीम इंडियाला पराभूत केलं. तर त्यानंतर न्यूझीलंडने  (New Zeland) पराभवाची धूळ चारली. दरम्यान आता या टीम इंडिया या स्पर्धेतील शेवटचा सामना हा आज (८ नोव्हेंबर) नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. (Playing in IPL became more important than playing for the country saying kapil dev)

टीम इंडियाला फटकारलं

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये निराशाजनक कामगिरी केली. यामुळे टीम इंडियाचे दिग्गज कपिल देव (Kapil Dev) चांगलेच संतापले आहेत. देव यांनी टीम इंडियाला खरी खोटी सुनावली आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीसाठी कपिल देव यांनी आयपीएलला (IPL) जबाबदार ठरवलंय. जर खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्याला प्राधान्य देतायेत, तर त्याला आम्ही तरी काय करु शकतो, अशा शब्दात देव यांनी संताप व्यक्त केला.

देव काय म्हणाले? 

"आयपीएल आणि टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनामध्ये अंतर पाहिजे होतं. भारतीय खेळाडूंची प्राथमिकता ही आयपीएलमध्ये खेळणं आहे. देशासाठी खेळण्यासाठी ते फार महत्त्व देत नाहीत", अशा शब्दात देव यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना आयपीएलच्या मुद्द्यावरुन खडेबोल सुनावले. ते एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळेस ते बोलत होते.  

"जेव्हा खेळाडू हे देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्याला जास्त प्राधान्य देत असतील, तर आम्ही काय बोलू शकतो. खेळाडूंना देशाचं प्रतिनिधित्व करताना गर्व वाटायला हवा. मला त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत माहित नाही, त्यामुले मी याबाबत काही बोलणार नाही", असंही देव यांनी स्पष्ट केलं.

बीसीसीआयला सल्ला

खेळाडूंसाठी पहिले देश त्यानंतर त्यांची फ्रंचायजी टीम असा प्राधान्यक्रम असायला हवा. मी असं नाही म्हणत की खेळाडूंनी त्यांच्या फ्रँचायजीसाठी खेळू नये, पण आता बीसीसीआयची जबाबदारी आहे की त्यांनी खेळाडूंना योग्य पद्धतीने मॅनेज करायला हवं. या चुकींची पुनरावृत्ती पुन्हा व्हायला नको हेच आपल्याला या स्पर्धेतून शिकायला मिळालं", असं देव यांनी नमूद केलं.    

कोहलीच्या नेतृत्वातील शेवटचा सामना

टी 20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा आणि कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा सामना असणार आहे. टीम इंडिया या सामन्यात नामिबिया विरुद्ध भिडणार आहे. टी 20 मधील कर्णधारपद या वर्ल्ड कपनंतर सोडणार असल्याचं विराटने याआधीचं जाहीर केलं होतं. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून कर्णधारपदाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न विराटचा असेल.