पोलार्डच्या संशयास्पद हालचालींची सोशल नेटवर्किंगवर चर्चा

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं शेवटच्या बॉलवर पुण्याचा पराभव केला. 

Updated: May 29, 2017, 09:13 PM IST
पोलार्डच्या संशयास्पद हालचालींची सोशल नेटवर्किंगवर चर्चा title=

मुंबई : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं शेवटच्या बॉलवर पुण्याचा पराभव केला. १३० रन्सचा पाठलाग करताना २० ओव्हरमध्ये पुण्याला फक्त १२८ रन्स करता आल्या. दरम्यान या मॅचबद्दल आता सोशल नेटवर्किंगवर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

या मॅचमध्ये शेवटच्या तीन ओव्हर बाकी असताना मुंबईची टीम रणनिती ठरवत होती. रणनिती ठरवल्यानंतर पोलार्डनं मनोज तिवारीच्या बाजूला जाऊन बुटांची लेस बांधली. यावेळी पोलार्डनं मनोज तिवारीला काहीतरी सांगितलं. पोलार्डच्या याच हालचालींचा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.