Prithvi Shaw break Saurav Ganguly record: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने इंग्लंडमध्ये वादळ निर्माण केलं आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या इंग्लिश टूर्नामेंट रॉयल लंडन वन डे कप स्पर्धेत पृथ्वी शॉने धुमधमाका करत धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे. शॉने आपल्या धडाकेबाज खेळीसह अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
रॉयल लंडन वनडे कपमध्ये सॉमरसेटविरुद्ध खेळताना पृथ्वी शॉने बॅटने कहर केला. पृथ्वी शॉने स्फोटक पद्धतीने खेळत 153 चेंडूत 244 धावांची संस्मरणीय खेळी केली. या खेळीदरम्यान शॉच्या बॅटमधून 28 चौकार आणि 11 गगनचुंबी षटकार खेचले. या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा शॉ हा पहिला भारतीय फलंदाज आहे. शॉने सॉमरसेटच्या गोलंदाजीचा कठोरतेने सामना केला आणि केवळ चौकार आणि षटकारांसह 178 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
Prithvi Shaw in 2023:
Scored his maiden triple hundred - 379 in 383 balls in the Ranji Trophy.
Scored 244 in 153 balls in the Royal London One Day Cup. pic.twitter.com/QhG2tOyaWk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 9, 2023
इंग्लंडमध्ये कोणत्या फलंदाजाला द्विशतक ठोकता आलं नाही. सचिन तेंडूलकर देखील याला अपवाद नाही. इंग्लंडच्या मैदानावर आत्तापर्यंत फक्त सौरव गांगुलीने मोठी खेळी केलीये. सौरव गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची धुंवाधार खेळी केली होती. तर 1983 च्या वर्ल्ड कपमधील 175 धावांची खेळी सर्वांना लक्षातच असेल. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, पृथ्वी शॉने आपल्या फलंदाजीची झलक दाखवून दिलीये.
आणखी वाचा - World Cup 2023: ना भारत ना पाकिस्तान, आश्विन म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
समरसेट प्लेईंग इलेव्हन : जॉर्ज थॉमस, अँड्रयू उमेद, लुईस गोल्डस्वर्थी, जेम्स रिव, शॉन डिक्सन, जॉर्ज बार्टलेट, कर्टिस कॅम्फर, डॅनी लॅम्ब, नेड लिओनार्ड, जॅक ब्रूक्स आणि शोएब बशीर.
नॉर्थहॅम्प्टनशायर प्लेईंग इलेव्हन : लुईस मॅकमॅनस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, एमिलियो गे, रिकार्डो वास्कोनसेलोस, सॅम व्हाइटमन, ल्यूक प्रॉक्टर, रॉब केओघ, टॉम टेलर, जस्टिन ब्रॉड, सायमन केरिगन आणि जॅक व्हाईट.