मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सीरिजमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहाणे यांची ही शेवटची संधी असणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये पुजारा आणि राहाणे यांची कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं दिसत आहे. जे टीम इंडियासाठी धोक्याचं आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचं करियर धोक्यात असल्याचीही चर्चा आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी सीरिजमध्ये फ्लॉप ठरल्यानंतरही अजिंक्य राहाणे आणि पुजारा यांना न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमध्ये पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. या संधीचं जर दोन्ही खेळाडूंनी सोनं केलं नाही, तर मात्र त्यांनी पुढच्या दौऱ्यासाठी धोका आहे.
कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पुजारा आणि रहाणे दोघांनाही चांगली सुरुवात करता आली नाही. तर श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलने आपली उत्तम कामगिरी दर्शवली आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना आता पुढच्या दौऱ्यासाठी संधी दिली जाऊ शकते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वगळणार?
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचं करियर धोक्यात येण्याची शक्यता आहे. यांची गेल्या तीन दौऱ्यांची कामगिरी पाहता त्यांना आता पुन्हा संधी देणार का? हा प्रश्न आहे. या दोन्ही खेळाडूंना दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान टीम इंडियातून वगळं जाण्याची शक्यता आहे. तर राहाणे आणि पुजारा ऐवजी गिल आणि अय्यरला संधी दिली जाऊ शकते.
टीम इंडियामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी हे दोन बदल झाले तर राहाणे आणि पुजारासाठी हा धोक्याचा इशारा असणार आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये आता या दोघांनाही आपली चांगली कामगिरी करावी लागणार आहे. नाहीतर यांचा पत्ता कट होऊ शकतो.