सेंचुरियन टेस्टनंतर ICC चा भारताला झटका, कोच द्रवि़डने अशी दिली प्रतिक्रिया

सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात, भारताला दंड ठोठावण्यात आला आहे.

Updated: Jan 2, 2022, 09:23 PM IST
सेंचुरियन टेस्टनंतर ICC चा भारताला झटका, कोच द्रवि़डने अशी दिली प्रतिक्रिया title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रविवारी कबूल केले की सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ओव्हर रेटमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पॉइंट गमावल्यानंतर त्यांच्या संघाला आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

ओव्हर-रेट कमी (Slow over rate) असल्यास WTC पॉइंट्स कमी केल्यास कोणत्याही संघाला अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत आठ षटके कमी टाकल्याबद्दल इंग्लंडला आठ WTC गुणांचा दंड ठोठावण्यात आला होता.

जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत द्रविड म्हणाला की, 'आयसीसी स्पष्टपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशिक्षक म्हणून चिडचिड होते असते आणि काही वेळा थोडे धाकधूकही वाटते. हे आम्हाला ओव्हर-रेटला गती देण्यासाठी प्रेरित करेल.'

द्रविड म्हणाला की, आयसीसीने बनवलेल्या नवीन नियमावर मला आक्षेप नाही, परंतु अधिकाऱ्यांना गुण वजा करण्यापूर्वी परिस्थितीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. "त्यांनी भूतकाळात दंड आकारण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते काम करत नाही, भूतकाळात इतर पद्धती वापरल्या पण त्या काम करत नाहीत. आयसीसीने आता गुण वजा करण्याची पद्धत अवलंबली आहे. मला यात काही अडचण नाही. मात्र, परिस्थितीनुसार थोडी शिथिलता द्यायला हवी. गेल्या वेळी आमचे काही खेळाडू जखमी झाले होते. अर्थात आम्हाला थोडी विश्रांती दिली होती. पण कधी कधी तसे होत नाही. तुम्ही किती मिनिटे गमवाल हे सांगणे कठीण आहे.'

ओव्हर-रेट सुधारण्यासाठी संघ कोणत्या क्षेत्रांवर काम करू शकतो यावर द्रविड म्हणाला, "जेव्हा बुमराहला दुखापत झाली, तेव्हा फिजिओला जाऊन बराच वेळ फिल्डवर घालवावा लागला. मागच्या वेळी चेंडू बदलण्यात आल्याने इतर काही समस्या होत्या."

भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह सामना खेळत असून त्यामुळे संघाला ओव्हर रेट राखणे कठीण होत आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये फिरकीपटूंची भूमिका अधिक असते आणि अशा परिस्थितीत या समस्येला तोंड द्यावे लागत नाही.