कोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Updated: Jul 13, 2017, 10:15 AM IST
कोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य title=

मुंबई : भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या ३ सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने हा निर्णय घेतला. रवि शास्त्रींना वर्ल्ड कप -2019 पर्यंत प्रशिक्षकपदी नियुक्त केलं गेलं आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या टीमचं कोतूक करत म्हटलं की, हा संघ कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची क्षमता ठेवतो.

शास्त्रींनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हा संघ कसोटीमध्ये चांगला खेळ करु शकतो. हा संघ प्रत्येक परिस्थितीत चांगली खेळी करू शकतो. संघात चांगले वेगवान गोलंदाजही आहे. संघाच्या माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कार्यकाळात जे वाद झाले त्याबाबत जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी कोणत्याही आव्हानासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.

शास्त्रींनी म्हटलं की, मला आव्हाने आवडतात. मी भारतीय संघासोबत कोणत्याही आव्हानांसाठी सज्ज आहे. जेव्हा खराब हवामानात तुम्हाला फलंदाजी करायला सांगितली जाते तेव्हा एक आव्हान असतं. मला आव्हानांची सवय आहे. शास्त्री यांच्यासोबत झहीर खानला गोलंदाज सहसल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.