close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एकाच विजयानंतर रवी शास्त्रीनं शेअर केला फोटो, होतेय जोरदार टीका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅच गमावल्यानंतर भारतानं जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विजय मिळवला. 

Updated: Jan 29, 2018, 07:57 PM IST
एकाच विजयानंतर रवी शास्त्रीनं शेअर केला फोटो, होतेय जोरदार टीका

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅच गमावल्यानंतर भारतानं जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विजय मिळवला. या विजयानंतर खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं. तर प्रशिक्षक रवी शास्त्रीनं इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला. या फोटोनंतर रवी शास्त्रीवर टीकेची झोड उठत आहे.

हातात बियरचा ग्लास असलेला फोटो रवी शास्त्रीनं इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. या फोटोवर सोशल नेटवर्किंगवर जोरदार टीका होत आहे. या सीरिजमध्ये भारतानं एकच मॅच जिंकली पण सीरिजमध्ये पराभव झाल्याची आठवण यूजर्सनी रवी शास्त्रीला करून दिली. तसंच पुढच्या सीरिजवर लक्ष द्यायचा सल्लाही शास्त्रीला देण्यात आला.

जोहान्सबर्गमधल्या विजयानंतर रवी शास्त्रीनं टीमचं कौतुक केलं होतं. मागच्या २५ वर्षांमध्ये मी खेळासाठी एवढी कठीण खेळपट्टी बघितली नव्हती, असं शास्त्री म्हणाला होता. तसंच भारतीय बॉलर्स आणि कॅप्टन विराट कोहलीचीही शास्त्रीनं स्तुती केली होती. 

 

As easy as a Sunday morning. Cheers.

A post shared by Ravi Shastri (@ravishastriofficial) on