भारताच्या पराभवाला शास्त्री-बांगर जबाबदार- सौरव गांगुली

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला.

Updated: Sep 4, 2018, 05:42 PM IST
भारताच्या पराभवाला शास्त्री-बांगर जबाबदार- सौरव गांगुली title=

कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला. या पराभवाबरोबरच भारतानं ५ टेस्ट मॅचची ही सीरिज ३-१नं गमावली आहे. सौरव गांगुलीनं भारताच्या या पराभवाला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर जबाबदार असल्याचं म्हणलंय. भारतीय टीमच्या बॅटिंगचा स्तर खूप पडला असल्याचं मत गांगुलीनं व्यक्त केलं. या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा फक्त ३१ रननी पराभव झाला. दुसऱ्या टेस्ट भारतानं इनिंग आणि २०३ रननं गमावली होती. तर तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. चौथ्या टेस्टमध्ये २४५ रनचा पाठलाग करताना भारतीय टीमला ६० रननी मॅच गमवावी लागली.

फक्त बॅट्समनच जबाबदार नाही

परदेशातल्या खराब कामगिरीला फक्त बॅट्समनच जबाबदार नाहीत. रवी शास्त्री आणि संजय बांगरनं याची जबाबदारी घेतली पाहिजे. विराट कोहलीच शानदार प्रदर्शन करतो मग इतर खेळाडू अपयशी का ठरतात, हे प्रशिक्षकांनी पाहिलं पाहिजे. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, तोपर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सीरिज जिंकणं अशक्य आहे, असं वक्तव्य गांगुलीनं केलं.