नवी दिल्ली : परदेशी संघ जेव्हा भारत दौर्यावर येतात तेव्हा आर. आश्विनला सर्वात खतरनाक खेळाडू मानतात. हे अनेकदा सिद्धही झाले आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये तर हे जग जाहीर आहे.
श्रीलंकेचा खेळाडू लाहिरु थिरिमने याचेच उदाहरण घ्या. भारताचा स्पिनर आश्विनने या लाहिरूला एक-दोन दा नव्हे तर तब्बल १२ वेळा आऊट केले आहे.
आश्विनने थिरिमनेला वनडे क्रिकेटमध्ये ६ वेळा पव्हेलिअनमध्ये पाठविले आहे. तर टेस्टमध्ये ५ तर टी २० मध्ये १ वेळा आऊट करण्यात यश मिळाले आहे.
पहिल्या डावात अश्विनने ७ मेडन ओव्हर टाकत २८.१ ओव्हर टाकल्या. यामध्ये ६७ धावा देत ४ विकेटही पटकावले होते. यामध्ये थिरिमने(९) च्या विकेटचाही समावेश होता.
आता श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरेल. रविचंद्रन अश्विनच्या एका नव्या रेकॉर्डकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. ३०० कसोटी विकेट्सपासून तो केवळ ४ विकेट्स दूर आहे.
पहिल्या डावात त्याने विकेट घेतल्या होत्या. तसेही नागपूरच्या जामठा क्रिकेट मैदानातील सामन्यात फिरकी गोलंदाजांचाच बोलबाला आहे.