मुंबई : क्वालिफायर-2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) राजस्थान रॉयल्सने (RR) सात गडी राखून पराभव केला. या पराभवाने आरसीबी संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. RCB संघाने IPL 2022 मध्ये तुकड्यांमध्ये चांगली कामगिरी केली. संघ एकत्र खेळू शकला नाही. RCB आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत न पोहोचण्याची तीन मोठी कारणे होती.
संघातून चांगल्या खेळाडूंना सोडण्यात आले
आरसीबी संघाने युझवेंद्र चहल आणि देवदत्त पडिक्कल या खेळाडूंना सोडले, ज्यामुळे संघ संयोजनावर परिणाम झाला. चहल आणि देवदत्त यांचा राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात समावेश केला होता. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2022 मध्ये जबरदस्त खेळ दाखवला. युझवेंद्र चहलने आयपीएल 2022 च्या 16 सामन्यात 26 विकेट घेतल्या. आरसीबी संघाला चहलची उणीव भासली. त्याचवेळी मोहम्मद सिराजने आरसीबी संघासाठी अत्यंत खराब कामगिरी केली.
सुपरस्टार खेळाडू फ्लॉप
आरसीबी संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली अजिबात आपल्या लयमध्ये दिसला नाही. संपूर्ण स्पर्धेत तो धावा काढण्यासाठी झगडताना दिसला. धोकादायक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने ही कामगिरीत सातत्य दाखवले नाही. IPL 2022 मध्ये विराट कोहलीने 341 धावा केल्या. मॅक्सवेलने केवळ 301 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांच्या खराब फॉर्मचा फटका संघाला बसला. दोन्ही फलंदाज जेव्हा जेव्हा लवकर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले, त्यामुळे त्यानंतरच्या फलंदाजांवर दबाव वाढला होता.
आरसीबीला एकही विजेतेपद मिळालेले नाही
आरसीबी संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही विजेतेपद जिंकलेले नाही. गेल्या ३ वर्षांपासून आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरत आहे, मात्र त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. यावेळी आरसीबी संघाची कमान फाफ डू प्लेसिसच्या हाती होती. संघाचा कर्णधार बदलला, पण नशीब बदलू शकले नाही.