IPL 2021 : कोण आहे 'ही' जिच्यासोबत RCB चा खेळाडू करत होता फ्लर्ट?

काईल जेमीसन हा मात्र भलत्याच फॉर्ममध्ये होता

Updated: Sep 23, 2021, 11:05 AM IST
IPL 2021 : कोण आहे 'ही' जिच्यासोबत RCB चा खेळाडू करत होता फ्लर्ट?  title=

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरलेल्या आरसीबी अर्थात बंगळुरूच्या संघाला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रातील पहिल्याच सामन्यात पचा सामना करावा लागला होता. केकेआर, कोलकाता संघानं 9 गडी राखत बंगळुरुवर मात केली होती. एकिकडे संघ सामन्यात दारुण पराभूत होत असतानाच दुसरीकडे बंगळुरूचा खेळाडू काईल जेमीसन हा मात्र भलत्याच फॉर्ममध्ये होता. 

काईल चर्चेत आला तो म्हणजे एका फोटोमुळं. जिथे तो संघाची मसाज थेरेपिस्ट नवनीता गौतम हिच्याशी फ्लर्ट करताना दिसला. आरसीबीची धावसंख्या 4 गडी बाद 54 इतकी होती. तिथं संघाची पडझड सुरु झालेली असताना जेमीसन मात्र इथं त्याच्याच कामगिरीवर लक्ष देत असल्याचं पाहायला मिळालं. जेमीसनची नवनीतावर पडलेली नजर आणि त्यानंतर व्हायरल झालेला फोटो पाहून अनेकांनीच तिच्या बाबत कुतूहल व्यक्त करण्यास सुरुवात केली. ज्यानतंर समोर आली तिच्याबाबतची माहिती... 

- 11 एप्रिल 1992 ला नवनीताचा जन्म झाला असून ती कॅनेडियन आहे. वॅन्कुवर मध्ये तिचा जन्म झाला. 

- आरसीबीच्या संघासोबत स्पोर्ट्स मसाज थेरेपिस्ट म्हणून ती 2019 ला जोडली गेली. आयपीएलच्या आठ संघांमध्ये असणारी ती एकमेव महिला सपोर्ट स्टाफ सदस्य आहे. 

- आयपीएलमध्ये येण्यापूर्वी नवनीता टोरंटोच्या संघासोबत काम करत होती. 

- 29 वर्षीय नवनीतानं भारतीय महिला बास्केटबॉल संघात एशिया कप कॅम्पेनदरम्यान, सपोर्ट स्टाफ म्हणून काम पाहिलं होतं.