वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्याची भावूक पोस्ट

शनिवारी सकाळी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन झालं.  

Updated: Jan 17, 2021, 05:18 PM IST
वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्याची भावूक पोस्ट

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचे शनिवारी सकाळी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्यामुळे पांड्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर केसाळला आहे. जेव्हा हार्दिक पांड्याच्या मोठ्या भावाला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळाली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्याने घेतला . यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्यानी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

वडिलांसोबत फोटो शेअर करत तो म्हणाला, 'तुम्हाला आम्ही गमावलं आहे. ही गो्ष्ट आम्ही आयुष्यात कधीही स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी गोड आठवणी ठेवून गेलात. आज तुमची मुलं जे काही मिळवू शकली आहेत, ते फक्त तुमच्यामुळे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

तो पुढे म्हणाला, 'तुम्हाला गर्व होता, पण आम्हाला सर्वांना गर्व आहे की तुम्ही तुमचं जीवन आनंतात घालवलं. तुमची नेहमी आठवण येईल.' अशा प्रकारे हार्दिकने वडिलांचं निधन झाल्यानंतर आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. 

हार्दिक आणि क्रुणाल या दोघांनी कायमच आपल्या यशाचं श्रेय हे वडिलांना दिलं आहे. दोघांच्या यशस्वी क्रिकेट खेळण्यामागे त्यांच्या वडिलांची मेहनत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारताचे माजी गोलंदाज इरफान पठानने हार्दिक आणि क्रुणाल पांड्याच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.