Rohit Sharma: आयपीएलमधील 33 वा सामना फार रोमाचंक ठरला. पंजाब विरूद्ध मुंबई यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 9 रन्सने सामना जिंकला. या सामन्यात मुंबईने 193 रन्सचं लक्ष्य पंजाबला दिलं होतं. 14 रन्सवर 4 विकेट्स गमावलेली पंजाब सामना हरणार असं असताना आशुतोष शर्मा आणि शशांक सिंह यांनी सामना जिंकण्याच्या मार्गावर आणला. शेवटच्या ओव्हरपर्यंत सुरु असलेल्या या सामन्यात रोहित आणि हार्दिक भिडल्याचा दावा केला गेला. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात.
शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्स करायच्या होते तेव्हा शेवटची जोडी क्रीजवर होती. दुसरीकडे हार्दिकने आकाश मधवालच्या हातात बॉल सोपवला. मात्र या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज आकाश माधला फिल्डींग लावल्याबाबत थोडा गोंधळला. यादरम्यान हार्दिक त्याच्याकडे आला आणि त्याच्याशी बोलू लागला, पण फिल्डींगबाबत आकाश समाधानी नव्हता. हार्दिक आणि आकाशच्या संवादादरम्यान माजी कर्णधार रोहित शर्माही तिथे आला.
रोहित तिथे येताच मधवालने हार्दिककडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. यानंतर तो फिल्डींगबाबत रोहित शर्माशी बोलू लागला. या कालावधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित आणि हार्दिक फिल्डींगबाबत आपापसात वाद घालतायत असा दावा करण्यात येतोय. मधवालने अखेर रोहितचे म्हणणं ऐकून त्यानुसार फिल्डींग लावली. या वेगवान गोलंदाजाने शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्स देत मुंबई इंडियन्सला 9 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.
During last over Akash Madhwal ignored hardik and listening to Ro and setting the Field pic.twitter.com/PhFGRijcq6
— Lucky (@lucky22076) April 18, 2024
मधवालने गोलंदाजीत 3.1 ओव्हरमध्ये 46 रन्स देत एक विकेट घेतली. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी तीन तर कर्णधार हार्दिकला एक आणि श्रेयस गोपालला एक विकेट मिळाली. पंजाब किंग्जकडून आशुतोष शर्माने 61 रन्सची तुफानी खेळी केली.
आशुतोष शर्माने चांगली फलंदाजी केली. त्याला भविष्यासाठी शुभेच्छा. मी माझ्या टीममधील खेळाडूंना टाईम आऊटच्या दरम्यान सांगितलं होते की, तुम्ही खेळात किती पुढे आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला खेळावर नियंत्रण ठेवावे लागेल. याशिवाय डेथ ओव्हर्समध्ये आम्ही अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करू शकलो नाही, पण विजय हा विजय आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, असं हार्दिक पंड्या म्हणाला.